Viral Funny Pati : सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पाट्या व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. काही पाट्या या मनोरंजनासाठी सुद्धा लावल्या जातात. काही पाट्यांवर सुंदर सुविचार तर काही पाट्यांवर मजेशीर ज्योक्स लिहिलेले असतात. या पाट्यांवरचे मेसेज ऐकुन अनेकदा पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक पाटी व्हायरल होत आहे. या पाटीवर मजेशीर मेसेज लिहिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाटीवर नेमके काय लिहिलेय. त्यासाठी तुम्हाला ही पोस्ट पाहावी लागेल. (why husband should give half the information to wife funny pati goes viral)

या व्हायरल पाटीवर तुम्हाला मजेशीर व भन्नाट मेसेज लिहिलेला दिसेल. हा मेसेज वाचून तुम्हीही पोट धरून हसाल. या पाटीवर लिहिलेय, “पत्नी ही आपली अर्धांगिनी, तिला अर्धीच माहिती द्या. सुखी व्हाल.” पती पत्नीच्या नात्यावर आधारीत हा मजेशीर मेसेज आहे. सोशल मीडियावर पती पत्नीच्या नात्यावर आधारीत अनेक ज्योक्स व्हायरल होत असतात. असाच हा भन्नाट मेसेज सध्या चर्चेत आला आहे. या पाटीवरील मेसेज वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

हेही वाचा : आजोबा नातवाचे प्रेम! गावी जाताना ढसा ढसा रडत होता नातू, आजोबांनी दहा रुपये हातात दिले तरी…; रेल्वे स्टेशनवरील VIDEO VIRAL

पाहा व्हायरल पोस्ट

surekha_kadam_25 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जागतिक सत्य” तर एका युजरने लिहिलेय, “अहो अर्धाच पगार पण द्या , त्याहून चांगले होईल.” आणखी एका युजरने लिहिलेय,”व्वा झक्कास आयडिया दिली ,धन्यवाद” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : भयानक! बघता बघता शेकडो पर्यटकांनी भरलेली बोट खोल समुद्रात बुडाली; Viral Video खरंच गोव्याचा आहे का? वाचा सत्य….

यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक पाटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल झाला होता. या पाटीवर दारावरची बेल वाजवणाऱ्यांसाठी विशेष सुचना दिली होती. ही सुचना वाचून कोणीही पुन्हा दारावरची बेल वाजवणार नाही. त्या पाटीवर लिहिले होते “बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो..एकदाच वाजवा” कमीत कमी शब्दांत समोरच्याचा अपमान करण्याची कला पुणेकरांकडे आहे. पुणेरी पाटी हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.