viral Video : शेती हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतात राबणारा शेतकरी हा आपल्या सर्वांचा बाप आहे. वर्षभर शेतात मेहनत करूनही अनेकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते, पण शेतकरी तरीसुद्धा शेतात निस्वार्थपणे कष्ट करतात. सध्या अशाच एका कष्टकरी शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शेतकऱ्याचा खरा सखा कोण हे कळेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक शेतकरी पाणी पिताना दिसत आहे. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो. तेव्हा तेथे असलेल्या दोन बैलांपैकी एक बैल या शेतकऱ्याला उठविण्याचा खूप प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. भावूक करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बैलांचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी आणि बैलाचे नाते खूप घट्ट असते. रात्रंदिवस शेतकऱ्याबरोबर राहणारा बैल त्यांचा खरा मित्र असतो. शेतकऱ्यांचा सखा आणि सोबती असणारा हा बैलसुद्धा तितकाच संवेदनशील असतो, असा दाखवणारा हा व्हिडीओ आहे.
kattar_shetkri_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “खरं प्रेम.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माणसापेक्षा जनावरांवर जीव लावा, कधीच धोका देणार नाहीत.” तर एका युजरने लिहिले, “निस्वार्थ प्रेम”, आणखी एका युजरने लिहिले, “याला खरं प्रेम म्हणतात.”