BoycottMaldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटाची भ्रमंती केली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मालदीवमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. मालदीवच्या काही सर्वोच्च मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काही अपमानास्पद टीका केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका

मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन (Mariyam Shiuna) यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर कमेट्स करीत त्यांना ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे संबोधले आहे. हे पोस्ट डिलीट करण्यात आली असून त्याचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे. हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धात इस्रायल गुंतलेला असतानाही भारताने त्या देशाशी चांगले संबंध राखल्याने त्यांनी अशी टीका केली आहे. पण, भारताने संघर्ष सुरू झाल्यापासून मानवता म्हणून पॅलेस्टाइनला मदत केली आहे.

हेही वाचा – “अमानवी कृत्य!” कुत्र्याच्या पिल्लाला पाजली व्हिस्की; धक्कादायक घटनेचा Video Viral

पंतप्रधान मोदींची लक्षद्वीप भेटीचे फोटो शेअर करत मालदीवच्या मंत्र्याने शेअर करत त्यांना ‘विदूषक’, ‘इस्राएलची कठपुतळी’ अशा शब्दात अपमान केला आहे.

पतंप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपला दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. मालदीवबाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता, पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “अलीकडेच मला लक्षद्वीपच्या लोकांसह राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही येथील बेटांचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून थक्क आहे. मला आगत्ती, बंगाराम व कवरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी बेटावरील लोकांनी आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लक्षद्वीपच्या हवाई दृश्यांसंह येथील सोंदर्याची झलक दाखवणारे फोटो येथे आहेत.”

हेही वाचा – रस्त्यावरून धावणाऱ्या कारमध्ये उभी राहून नाचतेय तरुणी; Video Viral पाहून नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

भारतीय पर्यटकांनी रद्द केला मालदीव दौरा

विशेष म्हणजे मालदीव हे बेट हे मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे. भारताला निसर्गसौंदर्य लाभले असूनही मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक या देशाला भेट देतात. पण, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर बॉलीवूड स्टार्ससह अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवचा दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव ट्रेंड (#BoycottMaldives) होत आहे.

एक्स ट्विटरवर एकाने स्क्रीनशॉट शेअर करीत लिहिले, “माफ करा मालदीव, माझ्याकडे माझे स्वतःचे लक्षद्वीप आहे. मी आत्मनिर्भर आहे.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “१ फेब्रुवारी २०२४ पासून पाम्स रिट्रीट (Palms Retreat) मालदीव येथे पाच लाख रुपायचं तीन आठवड्यांचं बुकिंग केलं होतं; पण त्यांचे मंत्री वर्णद्वेषी झाल्यानंतर लगेचच ते रद्द केलं.”

हेही वाचा – दाट धुक्यामध्ये जीव मुठीत घेऊन लोको पायलटने चालवली ट्रेन: अंगावर काटा आणणारा Video Viral

भारत आणि मालदीपमधील संबधात निर्माण होणार तणाव

दरम्यान, “मालदीवमधून भारतानं आपलं सैन्य मागे घ्यावं”, अशी विनंती मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयानं केली आहे. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान मोदींविरुद्ध टीका केल्याने संबंध आणखी बिघडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is boycott maldives trending why indians cancelled maldives tour after pm modi lakshadweep visit snk
Show comments