स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस देशातील तरुणांना समर्पित आहे ज्यांच्याकडे भारतासाठी निरोगी आणि चांगले भविष्य घडवण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंदांचे तरुणांशी घट्ट नाते होते, त्यामुळे त्यांचा वाढदिवस तरुणांना समर्पित करण्यात आला आहे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसादिवशी राष्ट्रीय युवा दिनही साजरा केला जातो.
आणखी वाचा – धर्म नाही, कुटिल राजकारणच जबाबदार!
‘असा’ होता स्वामी विवेकानंद यांचा प्रवास
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते वेदांताचे प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. वयाच्या २५ व्या वर्षी विवेकानंदांनी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. १८८१ मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जगभरातील लोकांना तत्त्वज्ञानी आणि विचारवंत म्हणून प्रेरणा देण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – खरे विवेकानंद आपणाला समजलेत का?
होते अनेक विषयांचे ज्ञान
विवेकानंदांना धर्म, तत्वज्ञान, इतिहास, कला, सामाजिक शास्त्र, साहित्य यांचे ज्ञान होते. शिक्षणात पारंगत असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व भारतातील तरुणांमध्ये रुजवणे. स्वामी विवेकानंद हे महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. देशभरातील सर्व तरुणांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांचे शिक्षण आणि आदर्श भारतीय तरुणांसाठी एक प्रेरणा म्हणून प्रक्षेपित केले जातात.
विवेकानंदांच्या जयंतीदिवशी रामकृष्ण मिशनचे केंद्र असलेल्या रामकृष्ण मठात आणि त्यांच्या शाखांमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. या दिवशी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पंतप्रधान मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुद्दुचेरीमध्ये २५व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.