Why Is There Small Pocket On Jeans: कितीही फॅशन येवो पण जीन्सची चलती आजही तितकीच आहे. अगदी आबालवृद्धांमध्ये जीन्सचे फॅड पाहायला मिळते. पूर्वी घरातल्या आया, मावश्यांकडून या जीन्सला बघून नाकं मुरडली गेली पण आता त्याच बायका पिकनिकला गेल्यावर लाजत का होईना जीन्स घालतात. जीन्स आपल्या आयुष्याचा एवढा मोठा भाग असूनही त्याविषयी अनेक अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या अनेकांना अजूनही माहित नाहीत. अशीच एक बाब म्हणजे जीन्सच्या बाजूला असणारा छोटा खिसा. भारतीय निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. कुरेशी यांनी यावरूनच एक मजेशीर ट्वीट केले आहे.
डॉ. कुरेशी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात असे म्हंटले आहे की, जीन्सच्या बाजूला असणारा छोटा खिसा हा तुम्हाला निवृत्तीनंतर मिळणारं पेन्शन ठेवण्यासाठी आहे. यावर इंटरेस्टिंग असं कॅप्शन देऊन डॉ. कुरेशी यांनी ट्वीट केले आहे. दरम्यान, अनेकांनी यावर मजेशीर कमेंट करून तुम्हाला निदान तेवढं तरी मिळत होतं आता तर जीन्सच्या बाजूला छोटा खिसा पण नाही आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनही मिळत नाही असे अनेकांनी या पोस्टखाली लिहिले आहे.
माजी निवडणूक आयुक्तांची पोस्ट चर्चेत
हे ही वाचा<< ..म्हणून Zudio एवढे स्वस्त कपडे विकतं! वाचून म्हणाल याला बोलतात ‘डोकं’
जीन्सच्या बाजूला का असतो लहान खिसा?
खरं तर, १८ व्या शतकात, जगभरात एक लहान साखळी घड्याळ वापरले जात होते. हे घड्याळ आपल्याजवळ ठेवण्यासाठी हा छोटासा कप्पा जीन्समध्ये बनवला होता.जीन्समध्ये बनवलेला हा छोटा खिसा सर्वप्रथम लेव्ही स्ट्रॉस नावाच्या कंपनीने सुरू केला. आज ही कंपनी लुईस या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. जीन्समध्ये असलेल्या या जागेला ‘वॉच पॉकेट’ म्हणतात. नंतर जेव्हा चैन असलेलं घड्याळाचा ट्रेंड कमी झाला तेव्हा लोकांनी कॉइन ठेवण्यासाठी त्याचा वापर सुरू केला.