हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये कपलचे किसींग सीन्स शूट करण्यात आले आहेत. अनेक हिंदी चित्रपटातही ट्रेनमध्ये रोमान्स करणारे कपल तुम्ही पाहिले असतील. यासंबंधीत एक प्रश्न सोशल मीडिया यूजरने उपस्थित केला होता. त्यानंतर भारतीय वन विभागाचे अधिकारी परवीन कासवान यांनी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे. त्यांची याबाबतची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आयएफएस अधिकारी कासवान सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. ते अनेक प्रकारचे प्रेरणादायी आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच जंगलातील महत्वाच्या घडामोडींबाबतही ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांची एक पोस्ट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ट्वीटरवर दिलेलं त्यांचं उत्तर खूप चर्चेत आहे. या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
IFS परवीन कासवान यांनी दिलं ‘हे’ उत्तर
एका ट्वीटर अकाऊंटवरून ट्रेनला लटकून किस करतानाचा एका कपलचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तुम्हाला तुमच्या प्रेमीसोबत अशाप्रकारे प्रेम करायला कोण रोखत आहे? कासवान यांनी याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, रेल्वे अॅक्टचं सेक्शन १५४. रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १५४ नुसार कारवाई केली जाते. यामध्ये एक वर्षांची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई केली जाते.
सोशल मीडियावर लोकांची रिअॅक्शन
इंटरनेटवर आयएफएस अधिकाऱ्यांचं उत्तर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. ट्वीटरवर शेअर केलेल्या या पोस्टला २.९ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ५४ हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केलं आहे.