ट्विटर हा असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी कोणत्या गोष्टी ट्रेण्ड होतील सांगता येत नाही, मग त्या राजकारणाशी संबंधित असो वा मनोरंजनाशी असोत. ट्विटरवर एकदा का कोणती गोष्ट ट्रेण्ड झाली की युजर्स एकापाठोपाठ एक ट्वीट करण्यास सुरुवात करतात. जेव्हा देशात किंवा जगात एखादे प्रकरण तापते तेव्हा त्याचे पडसाद ट्विटरवरही पाहायला मिळतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखाद्या नेत्याचा किंवा अभिनेत्याचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या दिवशी काही खास घटना घडली असेल तर त्या नेत्याचे नाव, अभिनेत्याचे नाव किंवा त्या घटनेशीसंबंधित वेगवेगळ्या हॅशटॅगसह ट्विटरवर ट्रेण्डिंग सुरू होते. यात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे निधन झाले तरी ते ट्विटरवर ट्रेण्ड सुरू होते, म्हणजेच संपूर्ण जगात काहीही झाले तरी ते ट्विटरवर काही वेळात व्हायरल होते. यात ट्विटरवर सध्या #MeAt19 खूप ट्रेण्ड करीत आहे. या हॅशटॅगसह लोक त्यांचे जुने फोटो शेअर करीत आहेत.

युजर्स या ट्रेण्डच्या माध्यमातून वयाच्या १९ व्या वर्षी ते कसे दिसायचे, ते फोटोंच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण काही युजर्सकडे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे काढलेले फोटो नाहीत म्हणून त्यांना खूप वाईट वाटत आहे. यात काही युजर्स म्हणतात की, ‘आम्ही १९-२३ वर्षांचे होतो तेव्हा कॅमेरा फोन नव्हते, असे मोबाइलही नव्हते. तरीही आम्ही वयाच्या १९ किंवा २३ व्या वर्षी काढलेले फोटो शोधत आहोत. ट्विटरवर मोठी स्पर्धा सुरू आहे,’ तर काही युजर्स म्हणतात की, ‘२०-२१ वर्षांची मुलेही #MeAt19 वर फोटो पोस्ट करीत आहेत. काही तरी विचार करा.’ तर अनेकांनी त्यावेळी आम्ही बेरोजगार होतो अशाप्रकारच्या मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

पाहा युजर्सच्या #MeAt19 वरील रिॲक्शन

Story img Loader