ट्विटर हा असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी कोणत्या गोष्टी ट्रेण्ड होतील सांगता येत नाही, मग त्या राजकारणाशी संबंधित असो वा मनोरंजनाशी असोत. ट्विटरवर एकदा का कोणती गोष्ट ट्रेण्ड झाली की युजर्स एकापाठोपाठ एक ट्वीट करण्यास सुरुवात करतात. जेव्हा देशात किंवा जगात एखादे प्रकरण तापते तेव्हा त्याचे पडसाद ट्विटरवरही पाहायला मिळतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखाद्या नेत्याचा किंवा अभिनेत्याचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या दिवशी काही खास घटना घडली असेल तर त्या नेत्याचे नाव, अभिनेत्याचे नाव किंवा त्या घटनेशीसंबंधित वेगवेगळ्या हॅशटॅगसह ट्विटरवर ट्रेण्डिंग सुरू होते. यात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे निधन झाले तरी ते ट्विटरवर ट्रेण्ड सुरू होते, म्हणजेच संपूर्ण जगात काहीही झाले तरी ते ट्विटरवर काही वेळात व्हायरल होते. यात ट्विटरवर सध्या #MeAt19 खूप ट्रेण्ड करीत आहे. या हॅशटॅगसह लोक त्यांचे जुने फोटो शेअर करीत आहेत.
ट्विटरवर का ट्रेंड होतोय #MeAt19 हॅशटॅग? युजर्स देतायत अशा रिअॅक्शन
ट्विटरवर अनेकदा काही ना काही ट्रेण्ड सुरू असतो. सध्या #MeAt19 जोरदार ट्रेण्ड करत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2023 at 19:21 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why meat19 trend on twitter users posting pics of the age of 19 sjr