Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. कधी सार्वजानिक ठिकाणचे तर कधी घरातील व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एका घरातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबाने नातवाचा जीव वाचवला आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Why should be grandparents in the house The little one was touching electric hitter the grandfather ran to save shocking video viral)
म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला खेळताना दिसेल. खेळत खेळत तो एका स्वीच बोर्डाकडे जातो आणि स्वीच बोर्डच्या खाली हिटर लावलेल्या बादलीला स्पर्श करतो. हे आजोबाला दिसताच आजोबा धावत येतात आणि त्या चिमुकल्याला उचलतात. या दरम्यान त्यांचा तोल जातो आणि ते चिमुकल्याला घेऊन खाली पडतात. त्यांचा पडण्याचा आवाज ऐकून चिमुकल्याचे आईवडील बाहेर येतात. चिमुकल्याची आई बाळाला उचलून कडेवर घेते त्यानंतर आजोबा चिमुकल्याच्या आईवडिलाना रागावताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या आजोबांची तळमळ पाहून कोणीही भावुक होईल. घरात वृद्ध लोक किंवा वडीलधारी लोक का असावेत, हे तुम्हाला या व्हिडीओवरून समजेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
official_vishwa_96k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “म्हणूनच घरात वडीलधारी मंडळी असावीत असे म्हणतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पालकांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घरात किंवा घराबाहेर लहान मुलांकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये पालकाच्या दुर्लक्षामुळे एक चिमुकला रस्ता क्रॉस करताना चारचाकी खाली आला होता.