Whales Dead In Australia : ऑस्ट्रेलियातील टास्मानिया स्पर्म व्हेलमुळे चर्चेत आहे. खरं तर येथे एकामागून एक १४ स्पर्म व्हेलचा मृत्यू झाला. हे प्रकरण किंग आयलंडचे आहे. येथील किंग बेटावरील समुद्रकिनारी सकाळी लोक फिरायला आले असताना त्यांनी किनाऱ्यावर अनेक व्हेल मासे मृतावस्थेत पडलेले पाहिले. आतापर्यंत व्हेल माशांच्या मृत्यूची कारणे समजू शकलेली नाहीत आणि आता तज्ज्ञ त्यांच्या मृत्यूचे कारणे शोधत आहेत. त्याचबरोबर त्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या माशांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला आहे, तो यापुढेही घडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ आता प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवून आहेत.
तस्मानियामध्ये व्हेलच्या मृत्यूबद्दल अनेकदा चर्चा होते. काही वर्षांपूर्वी तस्मानियाच्या पश्चिम किनार्यावर अशाच पद्धतीने ४७० पायलट व्हेल अडकलेल्या आढळून आल्या होत्या. आठवडाभर चाललेल्या बचाव मोहिमेनंतर १११ व्हेल माशांना वाचवण्यात यश आलं आणि ३५० व्हेलचा मृत्यू झाला. स्पर्म व्हेल ही सर्वात जास्त चर्चेत असलेल्या व्हेलपैकी एक आहे आणि ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते, अशा परिस्थितीत त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आणखी वाचा : हायवेवर सायकल चालवत होता अन् अचनाक बिबट्याने हल्ला केला, पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO
आतापर्यंत या माशांच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समजू शकलेले नाही, परंतु परदेशी मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तेथील जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे उथळ पाण्यात अडकून पडणे होय. हे स्पर्म व्हेल मासे शिकारीसाठी समुद्र किनाऱ्यावर आले असावेत आणि पाणी खाली आल्यानंतर ते किनाऱ्यावरील उथळ पाण्यात अडकले असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे जीवशास्त्रज्ञांचे मत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…
स्पर्म व्हेल ही माशांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव काळ्या बाजारात चढ्या भावाने विकला जातो. त्यामुळेच या व्हेल माशांची जगभरात अवैधरित्या शिकार केली जात आहे. सध्या संपूर्ण जगात या माशांची संख्या सुमारे तीन लाख आहे. या व्हेल माशांच्या शरीराचा प्रत्येक अवयव विकला जातो, पण त्यांच्या उलट्यांची किंमतही लाखो-कोटींमध्ये आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधुनिक युगातील ‘कबीर सिंग’! एकाच वेळी १५ सिगारेट ओढताना दिसला
एम्बरग्रीसला फ्लोटिंग गोल्ड किंवा तरंगणारे सोने असेही म्हणतात. स्पर्म व्हेलची उलटी करोडोंमध्ये विकली जाते, त्याच्यासमो सोने आणि हिरेही स्वस्त होतात. एम्बरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या आतड्यांमधून बाहेर पडणारा मेणासारखा पदार्थ आहे. जलजीवांचे तज्ज्ञ त्याला व्हेल माशांची विष्ठा म्हणतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की समुद्रात अशा अनेक प्रकारच्या वस्तू आहेत ज्या व्हेल गिळतात. परंतु पचण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे ते असे काही पदार्थ फेकतात. यामध्ये व्हेलच्या उलट्यांचाही समावेश आहे. तो राखाडी रंगाचा आहे. त्याच्या विष्ठेपासून कॉस्मेटिक क्रीम बनवल्या जातात, ज्या खूप महाग विकल्या जातात.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल
औषध कंपन्याही त्याची विष्ठा मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याशिवाय महागडे परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्याही त्यांच्या उत्पादनांमध्ये विष्ठेचा वापर करतात. बऱ्याच काळापासून व्हेलच्या उलटीला मागणी आहे. सेक्स तज्ज्ञ सांगतात की याचा वापर बहुतेक सेक्स संबंधित औषधे बनवण्यासाठी केला जातो. ही एक दुर्मिळ आणि महागडी गोष्ट आहे. ज्यासाठी लोक करोडो रुपये द्यायला तयार आहेत.
त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात २ किलो अंबरग्रीसची किंमत २ कोटी रुपये आहे. ज्या आरोपीकडून एम्बरग्रीस जप्त करण्यात आले त्याच्याकडे ४ किलो १२० ग्रॅम होते. Ambergris हा फ्रेंच शब्द आहे. एम्बरग्रीस सामान्यतः मृत शुक्राणू व्हेलच्या पोटातून काढला जातो.