भारतामध्ये दररोज हजारो-लाखो माणसे ट्रेनने प्रवास करतात. तुम्ही सुद्धा जर ट्रेनमधून प्रवास केला असेल तर एक गोष्ट तुमच्यादेखील लक्षात आली असेल ती म्हणजे रेल्वे रुळांमध्ये खूप दगड टाकलेले असतात. असे सांगितले जाते की जेव्हा रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच रेल्वे रुळांमध्ये दगड टाकले जात आहेत. असे करण्याची अनेक कारणं आहेत. आज आपण या गोष्टीमागची कारणे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेरूळ दिसायला जितके साधारण असतात तितके ते वास्तवात साधारण नसतात. या रुळांच्या खाली काँक्रीटच्या प्लेट्स असतात ज्यांना स्लीपर असे म्हणतात. त्यांच्या खाली हे दगड असतात, दगडांच्या खाली दोन वेगवेगळ्या थरांमध्ये माती आणि सर्वात खाली सामान्य जमीन असते.

Video : भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र ते फक्त लाडू विक्रीची दुकानं; कानिटकरांचा ४० वर्षांचा प्रवास । गोष्ट असामान्यांची : भाग १५

लोखंडापासून तयार केलेल्या एका ट्रेनचे वजन जवळपास दहा लाख किलो इतके असते. या ट्रेनला फक्त रेल्वेरूळ सांभाळू शकत नाहीत. एवढ्या जड ट्रेनचे वजन हाताळण्यात लोखंडाचे रुळ, काँक्रीटचे स्लीपर आणि दगड या सर्वांचा हातभार लागतो. बहुतेक भार या दगडांवरच असतो. दगडांमुळेच काँक्रीटचे स्लीपर त्यांच्या जागेवरून हलत नाहीत.

जर रुळांमध्ये दगड टाकले नाहीत तर हे ट्रॅक गवत आणि लहान-लहान झुडपांनी भरून जाईल. असे झाल्यास ट्रेनला रुळावरून धावताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे दगड रुळावर असणे गरजेचे आहे. तसेच, जेव्हा ट्रेन रुळावर येते तेव्हा कंपन निर्माण होते आणि त्यामुळे रुळ पसरण्याची शक्यता वाढते. म्हणूनच हे कंपन कमी करण्यासाठी आणि रूळ पसरण्यापासून वाचवण्यासाठी ट्रॅकवर दगड टाकले जातात.

‘हा’ अनोखा मास्क झाकतो केवळ नाक; जाणून घ्या ही आगळीवेगळी डिझाइन बनवण्यामागचं कारण

जेव्हा ट्रेन रुळावरून धावते तेव्हा सर्व भार काँक्रीटच्या स्लीपरवर पडतो. आजूबाजूला असलेल्या दगडांमुळे काँक्रीट स्लीपर स्थिर राहतात आणि ते घसरत नाहीत. रुळांवर दगड टाकण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे, रुळांमध्ये पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये. पावसाचे पाणी रुळावर पडल्यावर ते दगडातून जमिनीत झिरपते. त्यामुळे रुळांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होत नाही. याशिवाय रुळावर टाकलेले दगड पाण्यातून वाहूनही जात नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why stones are thrown in railway tracks interesting reasons behind this pvp