तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत आहात आणि अचानक तुम्हाला चहा प्यावीशी वाटली म्हणून तुम्ही ट्रेनमध्ये असलेल्या विक्रेत्याकडून चहा विकत घेतला. पण त्या बदल्यात तुम्हाला ७० रुपये द्यावे लागले तर तुम्हाला कसे वाटेल? भारतीय रेल्वेच्या भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीकडून एका कप चहासाठी ७० रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांना त्याची पावतीही देण्यात आली. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी एक व्यक्ती भोपाळ शताब्दीवरून दिल्लीहून भोपाळला जात होती. त्याने ट्रेनमध्ये चहा घेतला, त्यासाठी त्याच्याकडून ७० रुपये घेण्यात आले. त्याला या चहाचे एक बिलही देण्यात आले होते, ज्यामध्ये चहाची किंमत २० रुपये आणि उर्वरित ५० रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून आकारण्यात आले होते. प्रवाशाने या पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर युजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली.

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

चहाचे बिल सोशल मीडियावर आल्यानंतर यूजर्स चकित झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘२० रुपयांच्या चहावर ५० रुपये सर्व्हिस चार्ज, त्यामुळे चहाची किंमत ७० रुपये झाली आहे. लुटण्याचा हा सर्वोत्तम मार्ग नाही का?’ त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, ‘भाऊ, रेल्वे हे काय करत आहे?’ तर काहींनी सांगितले की एका कप चहावर ५० रुपये सेवा शुल्क खूपच जास्त आहे.

दरम्यान, याप्रकरणी रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. २०१८ च्या भारतीय रेल्वे परिपत्रकाचा संदर्भ देत रेल्वेने सांगितले की, जर एखाद्या प्रवाशाने शताब्दी-राजधानी सारख्या गाड्यांमध्ये आरक्षण करताना जेवण बुक केले नाही आणि प्रवासादरम्यान चहा, कॉफी किंवा जेवण इत्यादीची ऑर्डर दिली तर त्याला सेवा शुल्क म्हणून ५० रुपये द्यावे लागतील.

Optical Illusion: या चित्रात लपलेले १० प्राणी तुम्हाला सापडले का? १५ सेकंदामध्ये शोधणारा व्यक्ती ठरेल जिनिअस

आता एका कप चहाची ऑर्डर असली तरी प्रवाशाला सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे. राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये पूर्वी अन्न सेवा अनिवार्य होती, परंतु नंतर ती ऐच्छिक करण्यात आली. प्रवाशाची इच्छा असल्यास, तो तिकीट बुक करताना ट्रेनमध्ये जेवण आणि अल्पोपहार घेण्यास नकार देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याला फक्त तिकीटाचे शुल्क भरावे लागते.