Interesting Facts About Tigers : सोशल मीडियावर वाघांचे थरारक व्हिडीओ नेहमीच व्हायरल झालेले आपण पाहतो. वाघ कधी जंगलात फिरताना तर कधी शिकार करताना दिसतात. पण काही व्हिडीओ असेही आहेत, ज्यामध्ये वाघ पाण्यात बसलेले दिसतात. जंगलातील हिंस्र प्राण्यांना पाहायचा असल्यावर अनेकदा लोक जंगल सफारी करतात. जंगलात सफारी करताना अनेकदा वाघांचा कळप पाण्यात बसलेला दिसतो. यामागचं नेमकं कारण काय आहे? याबाबत आएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर आएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी व्हिडीओ शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. पाच वाघ पाण्यात बसून मस्त आराम करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून असं वाटतंय की ते शिकारीचं प्लॅनिंग करत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘वाघ आणि पाणी एकमेकांसाठीच बनले आहेत.’ विशेषत: वाघ गरमा वातावरणात राहणं पसंत करतात. वाघाच्या शरीरातील बहुतांश भागात घाम आणणाऱ्या पेशींची कमी असते. त्यामुळे जेव्हा त्यांचं शरीर गरम होतं, तेव्हा ते पाण्यात डुबकी मारून तासंतास राहतात.
इथे पाहा व्हिडीओ
वाघांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ३६ हजार व्यूज मिळाले आहेत. तक १ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, प्रकृती नेहमी सोबत राहायला शिकवते आमि एकमेकांचं महत्व सागंते. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, वाघाला पाण्यात पाहल्यावर आमचं मनोरंजन होतं. पण त्यांना पाण्यात राहायला का आवडतं? याबाबत कधी माहित नव्हतं. तिसऱ्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, मध्य प्रदेशच्या राष्ट्रीय उद्यानात नेहमीच वाघ असं करताना दिसतात.