Video Shows Children Gave Funny Answers To The Teacher : गृहपाठ (Home Work) म्हटले की शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपाळावर जणू काही आठ्याच येतात. शाळेतून आलो की बॅग घरात टाकून कधी झोपतोय तर कधी खेळायला जातोय असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. पण, गृहपाठ मात्र नकोसा वाटायला लागतो. शिवाय गृहपाठ केला नाही तर पायाचे अंगठे धरून वर्गाबाहेर उभे राहावे लागते, तर कधी ग्राऊंडला पाच फेऱ्या माराव्या लागतात ही भीतीसुद्धा कुठेतरी मनात असते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे.
व्हिडीओनुसार (Video) वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी गृहपाठ केलेला नसतो, तर शिक्षक या तिन्ही विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात. त्यानंतर एकेकाला त्याने गृहपाठ का केला नाही याचे उत्तर देण्यास सांगतात. पहिला विद्यार्थी म्हणतो, ‘वही आणली नाही.’ दुसरी विद्यार्थिनी म्हणते, गृहपाठ केला आहे, पण वही घरी राहिली; बॅगेत ठेवली होती, पण बहिणीने माझ्या बॅगेतून वही काढली. तर तिसऱ्या विद्यार्थिनीला जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा ती कारण आठवण्यास सुरुवात करते. नक्की तिसरी विद्यार्थिनी काय म्हणते व्हायरल व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास का केला नाही विचारतात. त्यावर प्रत्येक विद्यार्थी भन्नाट कारणे सांगतात. पहिला वही आणली नाही, दुसरी म्हणते वही घरी राहिली. तर तिसरी चिमुकली अ…अ… असे करून शिक्षकांसमोरच आठवण्यास सुरुवात करते आणि पोटात दुखत होते म्हणून नाही केला अभ्यास असे म्हणते. प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांची भन्नाट कारणे, त्यांचे हावभाव आणि त्यावर शिक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील.
२५ वर्षांपूर्वी आम्ही पण हेच कारण सांगायचो…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @marathi_memer_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून जुने दिवस आठवले आहेत. ‘वही घरी राहिली हे कारण अजून पुढे १०० वर्षे चालणार, २५ वर्षांपूर्वी आम्ही पण हेच कारण सांगायचो, वर्ष बदलत जातात पण कारण तीच राहतात. अहो सर, मी सगळा अभ्यास केला आहे पण वही घरी राहिली, दुसरे उत्तर हे जगजाहीर आहे… तिला १०१ तोफांची सलामी, थांबा ओ सर कारण आठवत नाही’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.