Extramarital Affair video: गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे आधुनिक आणि टेक्नॉलॉजीचा जमात असल्याने अनैतिक संबंधांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. प्रेम आणि विश्वासचा असा बळी जाताना पाहून नात्याचं महत्त्व कमी होतं चाललं आहे का असा प्रश्न पडतो. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पत्नीच्या नकळत तो एका महिलेला डेट करत होता. पण हुशार बायकोनं हॉटेलच्या रूममध्ये त्याला रंगेहात पकडलं. अन् मग काय, चक्क चपलेने त्याची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना आग्रामधील एका हॉटेलमध्ये घडली. एक व्यक्ती बायकोच्या नकळत एका महिलेला डेट करत होता. तिला घेऊन तो हॉटेलच्या रूममध्ये गेला होता. पण बायकोने त्याचा पाठलाग करून त्याला रंगहात पकडलं. बायकोला पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. तो हात जोडून माफी मागू लागला. पण बायको काही ऐकण्याच्या मानसितेमध्ये नव्हती. तिने आपल्या नवऱ्याला चपलेनं मारहाण केली. शिवाय या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – CCTV Video: उत्तर प्रदेशात भटक्या कुत्र्यांनी ७ वर्षांच्या मुलाचे लचके तोडले, चिमुकला ओरडत राहीला पण…
युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला