नवरा-बायको म्हटलं की भांडणं आलीच. सोशल मीडियावर नवरा-बायकोची वेगवेगळी व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही कपल हे लग्नानंतरही एकमेकांना त्यांचं स्वातंत्र्य देतात. म्हणजे कायम जोडीदाराकडे लक्ष ठेवून राहण्यापेक्षा त्याला जसं हवं तसं राहण्याची मुभा दिली जाते. जेणेकरून वैवाहिक आयुष्यात अडचणी येणारच नाहीत. पण जोडीदाराला दिलेली मुभा ही कधी कधी आपल्यावर संकट बनून येऊ शकते, याचा विचार मनात येत नाही. नेमका असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून बायकोने नवऱ्याची ज्या पद्धतीने पोलखोल केलीय ते पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा लग्न झाल्यानंतर कित्येका पुरूष आपल्या बायकोला आवडणार नाही म्हणून आपल्या मैत्रिणींसोबत लपून छपून बोलत असतात. बायकोपासून लपून छपून मैत्रिणींना कॉल, मेसेज करतात तसंच सोशल मीडिया प्रोफाइल बघत असतात. पण अनेकदा पुरूषांना हे माहित नसतं की बायको त्यांच्याही एक पाऊल पुढे असते. पुरूष जरी लपून छपून या सर्व गोष्टी करत असले तरी बायकोच्या नजरा त्यांच्यावरच असतात. कल्पना करा की, असंच करत असताना जर नवऱ्याला बायकोने रंगेहाथ पकडलं तर….? त्यानंतर त्याची जी काही अवस्था होईल याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. हे सारं काही विनोदी वाटत असलं तर नवऱ्याची फजिती ही पाहण्यासारखी असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये या नवऱ्याची सुद्धा नेमकी अशीच फजिती झालेली आहे.

बायकोला वेड्यात काढायला गेला अन्…

नवऱ्याच्या सवयी आणि त्यांचा स्वभाव सगळ्यात जवळून ओळखणारं कोणी असेल तर ती बायको असते. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा मोबाईलवर काही तरी पाहताना दिसून येतोय. सवयीप्रमाणे बायकोला नवऱ्यावर संशय येत असतो. मग बायको नवऱ्याला आपल्या बोलण्यात व्यस्त ठेवत असते आणि आपल्या पायांनी आरसा पकडते. नवऱ्याच्या हातात असलेल्या मोबाईलची स्क्रीन दिसेल अशाच दिशेने बायको तिच्या पायांमध्ये पडकलेला आरसा ठेवते. त्या आरशामध्ये जे काही दिसलं ते पाहून बायकोचा संशय मात्र खरा ठरला. नवरा त्याच्या मोबाईलमध्ये सुंदर मुलींचे फोटो पाहत होता.

नंतर बायकोने पुढे काही केलं ते पाहून हसू आवरणार नाही

आपला नवरा मोबाईल सुंदर मुलींचे फोटो पाहतोय हे कळल्यानंतर बायको त्याला विचारते, “मोबाईलवर काय पाहतोय?” त्यानंतर नवऱ्याने लगेच आपल्या मोबाईलवर फोटो बदलला आणि कुत्र्याचा फोटो दाखवला. नवऱ्या आपल्यापासून लपून इतर मुलींचे फोटो पाहतो हे पाहिल्यानंतर बायकोला राग येतो आणि रागाच्या भरात ती नवऱ्याला लाथ मारते. बायकोचा मार खालल्यानंतर नवऱ्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो.

नवऱ्याची फजिती झाल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. यामूर आणि ओकान नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ८ लाख ७८ हजार लोकांनी लाईक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife caught husband while scrolling other womens hot and sexy photos prp