Extramarital affair News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात.
विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. दरम्यान उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर एक वेगळाच राडा झाला आहे. पीडित पतीने त्याची पत्नी इन्स्टाग्रामवरुन तिच्या प्रियकराबरोबर अश्लील चॅट करते असा आरोप केला आहे. या दोघांना आपण चॅट करताना रंगेहाथ पकडल्याचा दावाही या पीडित पतीने केला आहे.
सासऱ्यांनी केला समजवण्याचा प्रयत्न
हे प्रकरण माढोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, १० फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या मुलाचे लग्न अमरोहा गावात राहणाऱ्या मुलीशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. मात्र त्यांच्या सुनेने दुसऱ्या तरुणाशी इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केले. त्यांच्या मुलाने याला विरोध केला असता त्यांनी घरातच भांडण सुरू केले. त्याने आपल्या सुनेलाही समजावले पण तरीही सुनेनं त्या तरुणाशी बोलणं सुरुच ठेवलं.
हेही वाचा >> कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीची धडपड; बाबांच्या कुशीतून अचानक मारली उडी अन्…VIDEO व्हायरल
सासरच्यांना घरात घुसुन मारहाण
८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता या माहिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या लोकांना घरात घुसून मारहाण केली. या महिलेच्या पतीबरोबरच तिच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. तसेच या तिघांना या महिलेच्या माहेरच्यांनी धमकावलं. यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कलम ३५२, ३२२, ५०४, ५०६, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पत्नीने सासरच्या लोकांविरोधात हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस सध्या तपास करत आहेत. असून मुळात मारहाण का झाली? ही महिला ज्या तरुणाबरोबर बोलत होती तिचा प्रियकर आहे का? लग्नापूर्वी या दोघांमध्ये काही संबंध होते का याबद्दल पोलीस तपास करत असून सध्या दोन्ही बाजूच्या तक्रारी दाखल करुन घेण्यात आल्या आहेत.