Viral Video : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर खायला काय ऑर्डर द्यायची, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो आणि मग मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. या संवादादरम्यान काही जण ‘मला काहीही चालेल किंवा तू जे मागवशील, ते मी खाणार’ असे आपण सहज बोलून जातो. तर असे ऐकल्यावर अनेक जण यावर विनोद करतात आणि हॉटेलमध्ये किंवा मेनू कार्डमध्ये असा पदार्थ नाही मिळत, असे सांगतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका महिलेने ‘काहीही’ शब्दाचा पदार्थ तिच्या नवऱ्यासाठी बनवला आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रेखा आणि अक्षय, अशी या जोडप्यातील व्यक्तींची नावे आहेत. जेवणासाठी काय बनवायचं, असे रेखा तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला विचारते. त्यावर अक्षय ‘काहीही बनवं’ असे उत्तर देतो. सारखे सारखे हेच उत्तर ऐकून रेखाला एक मजेशीर कल्पना सुचते. ती तवा गॅसवर ठेवते आणि ‘काहीही’ अक्षर लिहिण्यासाठी बेसनच्या पिठाचा उपयोग करते. तव्यावर ‘कुछ भी’ असे हिंदी भाषेत एक एक अक्षर लिहिते. नंतर ताटामध्ये प्रत्येक अक्षर ओळीत लावून बाजूला टोमॅटो सॉसने सजावट करते आणि नवऱ्याला जाऊन देते. नवरा ‘काहीही’ बनवायला सांगतो म्हणून ती ‘कुछ भी’ हा शब्द तव्यावर तयार करून, नवऱ्याला जेवण म्हणून खायला देते. या महिलेची भन्नाट कल्पना एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच

Funny video Woman on instagram got 30 million views video viral on social media
ना अश्लील डान्स ना स्टंटबाजी; तरी ३० कोटी लोकांनी का पाहिला असावा हा VIDEO? महिलेने असं काय केलं तुम्हीच पाहा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Women Making Karwa Chauth Viral Video
‘बापरे! तिने नवऱ्याच्या मानेवर पाय ठेवून…’ करवा चौथ स्पेशल रील बनवण्यासाठी महिलेचा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Woman Shares Heartfelt Story on Why Mother's Home Matters After Husband's Kidney Failure
“लग्नानंतर एका वर्षात माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या..” महिलेनी सांगितले आयुष्यात माहेर का महत्त्वाचे? पाहा VIDEO
Ukhana video by aaji old lady social viral ukhana funny video goes viral
“मळ्याच्या मळ्यात होतं निंबोनीचं झाड…” आजीबाईचा सैराट स्टाईल गावरान उखाणा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Wedding bride dance video bride on song honar sun mi ya gharachi dance after seeing his groom on stage bride video
VIDEO: “होणार सून मी या घरची” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; सासरची मंडळीही पाहतच राहिली
Viral Video person dragged the dog
‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”

हेही वाचा…फक्त २ मुलांना सांभाळण्यासाठी ८३ लाख पगार अन् सहा महिने सुट्ट्या; खाजगी विमानाने प्रवास करण्याचीही संधी

व्हिडीओ नक्की बघा :

‘काहीही’ शब्दाचा तयार केला नवऱ्यासाठी पदार्थ :

आई स्वयंपाक करायला घेताना मुलांना किंवा बाबांना विचारते, आज जेवणात काय बनवू? त्यावर प्रत्येक जण ‘काहीही बनव’ असे हमखास उत्तर देतो. तर यावर उपाय म्हणून या जोडप्याने मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. रेखाने नवऱ्यासाठी काहीही (कुछ भी) हा शब्द ताटात वाढला आहे. रेखा काहीही या शब्दाची अक्षरे तयार करण्यासाठी बेसन वापरते आणि ते तव्यावर शिजवून घेते. ती अक्षरे नीट शिजवल्यानंतर ताटामध्ये काढून टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करते. नवरा हे पाहून आश्चर्यचकित झाला आणि काही वेळ ताटाकडे पाहत राहिला. कारण- अन्नाऐवजी बेसनापासून बनवलेला ‘काहीही’ शब्द त्याला ताटात दिसला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rakshay26 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून ‘जशास तसे’, ‘काहीही तव्यावर लिहिणंसुद्धा एक टॅलेंट आहे’, ‘आता यापुढे नवरा कधीच काहीही बनव असे म्हणणार नाही’ अशा कमेंट अनेक जण करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत. अक्षय आणि रेखा सोशल मीडियाचे कंटेंट क्रिएटर आहेत; हे जोडपे सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतात.