राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही.माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण या रागानं अनेकदा होत्याचं नव्हतं होतं. लग्न झालेला प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदारावर अपार प्रेम करत असतो. तो जोडीदाराविना राहू शकत नाही. पण नाईलाजाने काही लोकांना जोडीदारापासून लांब रहावं लागतं. नवरा-बायकोचं नातं हे जगावेगळं असतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये भर कोर्टात बायको नवऱ्याचा जामीन वाढवला म्हणून ढसाढसा रडतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगासाठी गुन्हेगार पण तिच्यासाठी ‘तो’ नवराच असतो. याचं उदाहरण म्हणजे, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला कोर्टात उभी आहे, तिचा नवरा एका गुन्ह्यामुळे जेलमध्ये आहे. दरम्यान त्याच्या जामीनाच्या सुनावणीसाठी ती कोर्टात उपस्थित आहे. यावेळी नवऱ्याच्या जामीनाची तारीख न्यायाधीशांनी वाढवल्यामुळे तिला रडू कोसळलं आहे. यानंतर ती न्यायाधीशांकडे हात जोडून माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर जामीन द्या अशी विनंती करताना दिसत आहे. यावेळी न्यायाधीश आधी सांगायला हवं होतं असं उत्तर तिला देतात. यावर ती पुन्हा विनंती करते. ६ हप्त्यानंतर जामीन मिळणार असं न्यायाधीश सांगतात यावर तिनं विनंती केल्यानंतर त्यांनीही दया येते आणि जामीन ४ हप्त्यानंतर ते जाहीर करतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: बापरे! हातात किंग कोब्रा पकडून खेळत होती महिला, पण फण्याला हात लावला अन्…

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही हसवणारे असतात तर काही रडवणारे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरीही संमिश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife crying in front of judge for his husband bell from jail emotional video viral on social media srk