कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी खूप धैर्य लागते. या आजारामुळे काही लोक खूप अशक्त होतात, पण जेव्हा त्यांना कोणाचा तरी आधार मिळतो तेव्हा त्यांची हिम्मत आणखी वाढते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पत्नीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे, अशा स्थितीत पती तिचे केस कापतो आणि नंतर तो स्वतःचे केसही कापतो. शेवटी दोघांनाही रडू कोसळते.अशा कठिण परिस्थितीमध्येही नवरा पत्नीची साथ सोडत नाही. हा व्हिडीओ लोकही भावूक झाले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, पती आपल्या पत्नीचे केस ट्रिमरने कसे कापतो. मग पत्नीला आधार देण्यासाठी तो स्वत:चे केस कापतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप भावूक झाले आहेत. व्हायरल या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोक नवऱ्याची धैर्याचे कौतूक करत आहे.
हेही वाचा – मच्छर किंवा माश्यांमुळे वैतागला आहात? मग, ‘हा’ सोपा उपाय करा, पाहा व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. १ लाख ८३ हजार यूझर्सने हा व्हिडिओ लाइक केला आहे. हीं व्हिडीओ २० लाख अधिकलोकांनी पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहले, ”प्रेम असावे तर असे’ तर दुसऱ्याने लिहले की,खरचं दोघांची जोडी खूप सुंदर आहे. देव तुमचे रक्षण करो”