पती-पत्नीचे नाते हे फक्त प्रेमाचे नसते तर विश्वासाचे असते. कोणतेही नात्यामध्ये विश्वास असणे अत्यंत आवश्यक असते. पती-पत्नी नात्यामध्ये जेव्हा फसवणूक होते तेव्हा त्या नात्यातील विश्वास संपतो जो नाते संपण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. अनेकदा पत्नी-पत्नीच्या नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो आणि ते नाते तुटते. सध्या अशाच एका नात्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक पत्नीने पतीला तिची फसवणूक करताना रंगेहाथ पकडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर असे व्हिडीओमध्ये अनेकदा चर्चेत येत असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये पतीला फसवणूक करताना पकडल्यानंतर पत्नीने जे केले ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडिओ ब्राझीलमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये डायाना सेग्टोविच नावाची डॉक्टर महिला तिची फसवणूक करणाऱ्या पतीला पकडण्याचा प्रयत्न करते जो एका कारमध्ये बसलेला आहे. कारमध्ये बसलेल्या पतीला पकडण्यासाठी महिला चक्क कारला लटकते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
व्हिडीओमध्ये दिसते की, चिडलेली महिला कारच्या काळ्या रंगाच्या खिडकीला पकडून कारच्या पायरीवर उभी असलेली दिसत आहे. कार वेगाने धावत आहे आणि ती महिला कार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कॅमेरात कैद झालेला हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डायना सेग्टोविचने रविवारी प्रथमच तिच्या वर्कआउट गिअरमध्ये स्वतःचे फोटो इंस्टाग्रामवर तिच्या हजारो फॉलोअर्ससाठी पोस्ट करून या घटनेला संबोधित केले.
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही; नुकतीच अशीच एक घटना भारतात घडली आहे जिथे मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका महिलेने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.