लग्न हा प्रत्येकाच्या आयु्ष्यातील महत्वाचा क्षण असतो. या दिवशी प्रत्येकजण आपण खास कसे दिसू याची काळजी घेत असतो. मुली तर लग्नात सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या मेकअप आणि कपड्यांची खूप काळजी घेत असतात. या खास दिवसासाठी त्या खूप तयारी करतात. शिवाय पुर्ण तयारी केल्याशिवाय त्या लग्नाच्या स्टेजवर जात नाहीत. पण लग्नाच्या स्टेजवर पोहचल्यावर एखाद्या वधूने आपली तयारी अर्धवट राहिली म्हणून लग्न थांबवल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नाही, तर मग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा. हो कारण, या व्हिडिओमध्ये एक वधू तिच्या लग्नाच्या ड्रेस व्यवस्थित नसल्याचं सांगत स्वत:च लग्न मध्येच थांबवताना दिसत आहे.
या वधूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू आणि वराचे ख्रिश्चन पद्धतीने लग्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वधू-वर स्टेजवर उभे असताना काही लग्नाचे विधी पार पाडले जात आहेत. यावेळी वधू काही काळ लग्न थांबवण्यास सांगते. वधूने लग्न थांबवायला सांगतात उपस्थित सर्वजण गोंधळतात आणि आश्चर्यचकित होऊन वधूकडे पाहू लागतात.
…म्हणून वधूने लग्न थांबवले –
लग्नाच्या या व्हिडीओमध्ये वधू अचानक लग्न थांबवण्यास सांगते आणि त्यानंतर ती माईक हातात घेते. यावेळी ती स्वतःच लग्न थांबवण्याचे कारण सांगते. ती म्हणते, मी माझा लग्नाचा पूर्ण ड्रेस घातला नाही, शिवाय ती लग्नात उपस्थित पाहुण्यांना “मी पूर्ण ड्रेस घालू शकते का?” असं विचारते. लोकांनी होकार देताच ती तिचा ड्रेस मागवून घेते आणि लग्नाचा पुढचा विधी सुरू करते.
@jetsetbecks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वधूचे नाव बेकी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ खूप आवडल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मुली सुंदर दिसण्यासाठी काहीही करू शकतात असं म्हटलं आहे. तर काही लोकांनी वधूच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.