इंटरनेटवर सर्व प्रकारच्या मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओंचं जणू भांडारच आहे, जे लोकांचे नेहमी मनोरंजन करत राहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप हसवत आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे आणि विनोद पाहायला मिळतात. इतकंच नाही तर कधी-कधी बायकाही नवऱ्याची थट्टा करतात. पत्नींची कधी कधी अशी मस्करी असते की त्यांच्यावर विश्वास होत नाही. नेमका असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवऱ्याची जी अवस्था होते, हे पाहून तुम्ही खळखळून हसाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हा एक प्रॅंक व्हिडीओ आहे. पत्नीने तिच्या पतीसोबत केलेला हा प्रँक आहे. पत्नी त्यांच्या खोलीत प्रवेश करते त्यावेळी पती शांतपणे झोपलेला दिसून येत आहे. पती गाढ झोपेत असताना पत्नी एक मृत मासा घेऊन त्याच्या जवळ जाते. या मृत माशाच्या तोंडाने पत्नी पतीच्या गालाला आणि ओठांना स्पर्श करते. आपल्या गालांना आणि ओठांना स्पर्ध करणारे ओठ हे आपल्या पत्नीचे असतील, असा भास या पतीला होऊ लागतो. आपली पत्नीच आपल्याला स्पर्श करतेय, असं समजून पती देखील हे क्षण एन्जॉय करत असतो. पती सुद्धा या मृत माशाला किस करू लागतो. त्यावेळी मात्र त्याची झोपच उडून जाते.
जेव्हा पती या मृत माशाला किस करू लागतो त्यावेळी त्याला शंका येऊ लागते. मृत माशाची दुर्गंध जेव्हा त्याला येते त्यावेळी तो आपले डोळे उघडून पाहतो. आपल्याला स्पर्श करणारी आपली पत्नी नव्हे तर एक मेलेला मासा आहे, हे कळल्यांनतर पती खडबडून जागा होतो. आपल्या सोबत पत्नीने प्रॅंक केलाय हे त्याच्या लक्षात येतं. या प्रॅंकमध्ये नवऱ्याची जी अवस्था होते ते पाहून पत्नीला हसू आवरणं अवघड होतं. पतीसोबत प्रॅंक केल्यानंतर पत्नीचा खळखळून हसण्याचा आवाज व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : एकत्र बसून खोलीत आराम करत होते, तेवढ्यात कोसळला छताचा पंखा
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा प्रॅंक व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळे विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर शेअर करताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : स्वतःचा व्हिडीओ बघताच माकडांची मजेशीर रिअॅक्शन; VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल
इंटरनेटवर सर्व प्रकारच्या मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडिओंचे भांडार आहे, जे आमचे मनोरंजन करत राहतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप हसवत आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे आणि विनोद पाहायला मिळतात. इतकंच नाही तर कधी-कधी बायकाही नवऱ्याची थट्टा करतात.