पुणे हे खरंच सुंदर शहर आहे. पुण्यात ऐतिहासिक, नयन रम्य ठिकाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत पण ही ठिकाण नाही तर येथे राहणारी लोक पुण्यांच्या सौंदर्य वाढवातात. पुण्यात लोकांना दिलखुलास व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. कोणतेही प्रशिक्षण न घेता येथे राहणारी प्रत्येक व्यक्ती पुणेरी शैली आत्मसात करतो. या पुणेरी शैलीची झलक आपल्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाहायला मिळते. कधी कोणी गेटसमोर पुण्याची पाटी लावून इतरांना प्रेमळ शब्दात सूचना देतो तर कोणी दुकानाबाहेर पाटी लावून अगदी स्पष्ट शब्दात आपण व्यावसायिक असल्याची कबुली देते. आजकाल हे पुणेकर भर रस्त्यात हातात पुणेरी पाटी घेऊन बिनधास्तपणे उभे राहतात आणि सर्वांच्या चेहर्यावर हसू आणतात. हे फक्त पुणेकरचं करू शकतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या अशाच एका व्हिडिओ सर्वत्र चर्चा होत आहे व्हिडीओमध्ये हातात पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या तरुणाने सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा