प्रत्येक जवानाला आपलं कुटुंब, संसार, भावना या असतातच. पण ते सर्व बाजूला ठेवून वयाच्या ऐन तारुण्यात लढत राहतो प्रत्येक जवान. आपल्या मुलाला सैन्यात पाठवणारे ते आई-वडील केवढ्या मोठ्या मनाचे असतील! देशासाठी आपल्या पोटचा गोळा देणं म्हणजे केवळ शौर्य असतं त्या मातेच्या भाळी? एका मातेसाठी आपला मुलगा व पत्नीसाठी आपला नवरा देशासाठी लढतो याचा अभिमान असतोच.जवानांचं सीमेवरच जगणं पाहिलं तर, हृदय हेलावून जाणारं असतं. मात्र हाच आईच्या काळजाचा तुकडा, पत्नीचा आधार पुन्हा आपल्या मायभूमी येतो तेव्हा होणारा आनंद हा त्या कुटुंबालाच ठाऊक असतो. अशाच एका जवानानं घरी येत आपल्या पत्नीला सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहू तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतमातेचा तिरंगा समोर दिसला की त्याचा अभिमान जागा होतो. फौजी तिरंग्यासाठी जगतो आणि तिरंग्यासाठी बलिदान देतो. तिरंग्याचे तीन रंग फौजीचे आयुष्य रंगीबेरंगी बनवतात. मात्र या सगळ्यात त्यांची नाळ कुटुंबाशीही जोडलेली असते.अशाच एका जवानानं आपल्या बायकोला सरप्राईज दिलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुममध्ये एक बेड ठेवला आहे. तो त्या रुममधून शिफ्ट करायचा आहे. यावेळी याठिकाणी असलेल्या तीन महिला हा बेड सरकवताना दिसत आहे.

याचवेळी जवान गुपचूप येतो आणि त्या बेडवर झोपतो. या महिलेला याची जराही कल्पना नसते. यावेळी जेव्हा ती बेड पूर्णपणे खाली ठेवते तेव्हा तीला तिचा नवरा दिसतो आणि ती आश्चर्यचकित होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये.एवढ्या दिवसांनी घरी आलेल्या जवानाला पाहून ती तिचे अश्रू थांबवू शकली नाही, तिने लगेच त्याला मिठी मारली. हा भावनीक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर; ‘हा’ व्हायरल VIDEO विचार करायला भाग पाडतोय

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @1_businessmotivation’s या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife overcome with emotion seeing military husband return home emotional video viral on social media srk