Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर इतके मजेशीर असतात की ते पाहिल्यावर आपल्याला हासू आवरत नाही. बऱ्याचदा लग्न, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक समारंभातलेही काही व्हिडीओ खूप चर्चेत येतात. काही जणांना अशा समारंभांमध्ये व्हिडीओ व फोटो काढायची प्रचंड आवड असते. पण, काही वेळा असे व्हिडीओ काढतानाही फजिती होऊ शकते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरी एका चिमुकल्याला ढकलून देते. नवरीनं असं का केलं आणि हा व्हिडीओ नेमका काय आहे याविषयी पाहुया.
लग्न म्हंटल की धावपळ ही आलीच, अगदी लग्नाच्या आधीही आणि लग्नातही सगळ्याच गोष्टिंची घाई असते. यामध्ये नवरा नवरीही धावपळीनं थकलेले असतात. अशाच एका वैतागलेल्या नवरीच्या व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नासाठी एक नवरी तयार झालेली दिसत आहे. तिचं फोटोशूट सुरु असल्याचं दिसत आहे. काही लोक तिचे फोटो, व्हिडीओ काढताना दिसत आहे. नवरीच्या बाजूला एक मुलगी बसलीय तीदेखील या फोटोंमध्ये येत आहे. मात्र नवरीला बसायला अडचण होत आहे आणि ती मुलगी तिच्या ओढणीवर बसलीय. ती तिला ओढणी सोडण्यास सांगते मात्र ती मुलगी बसून राहते मग रागात नवरी त्या मुलीला ढकलून देते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शेतकऱ्याचा नाद नाही! म्हशीचे आभार मानत गाडीच्या मागे लिहली भन्नाट गोष्ट; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंटचा पाऊस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ @desimojito नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करणेयात आलाआहे.