कोणाचं नशीब कधी बदलेल हे आधीच सांगता येणं कठीण आहे. अशीच एक घटना एका माणसाबरोबर घडलीय. पत्नीच्या सांगण्याने किराणा दुकानातून समान भरायला गेलेल्या व्यक्तीचं नशीब पालटलंय. यासाठी त्याने आपल्या पत्नीचे आभार मानावेत तितके कमी आहेत. प्रेस्टन माकी, या इसमाने तब्बल दीड कोटींची लॉटरी जिंकली आहे. त्याने मिशिगन लॉटरी अधिकार्यांना सांगितले की त्याच्या पत्नीशिवाय हे संभव नव्हते. तिने मेसेज केला नसता, तर मी ही लॉटरी जिंकू शकलो नसतो.
प्रेस्टन माकीने सांगितले की, “मी कामावरील दिवस संपवून घरी परतत असताना माझ्या पत्नीने मला किराणा दुकानातून सामान आणण्याचा मेसेज केला. २ लाख डॉलरपेक्षा जास्त बक्षीस असल्याशिवाय मी फॅन्टसी ५ खेळात नाही. मात्र, यावेळी मी पाच सोप्या निवडी विकत घेण्याचा निर्णय घेतला.”
दुसऱ्या दिवशी सकाळी, माकीने लॉटरीच्या मोबाईल अॅपने तिकीट स्कॅन केले आणि पाहिले की तो जॅकपॉट विजेता आहे! त्याने निवडलेले ५-१२-१६-१७-२९ हे सर्व अंक जुळून आले आणि त्याने बक्षीस जिंकले. त्याच्यासाठी जिंकणे खूपच अकल्पनीय होते. माकीने सांगितले की, या कमाईतील काही रक्कम गुंतवण्याचा आणि काही भाग कुटुंबाला देण्याचा त्याचा मानस आहे.
प्रेस्टन माकी या लॉटरीमधून १,९०,७३६ डॉलर्स म्हणजेच जवळपास डिड कोटी रुपये जिंकला आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रेस्टनने सांगितले की, सुरुवातीला मी माझ्या पत्नीला सामान खरेदी करण्यास नकार दिला होता. पण माझ्या पत्नीने विनंती केल्यानंतर कामावरून परतत असताना मी जवळच्या किराणा दुकानात सामान आणायला गेलो. त्या दिवशी माझ्या बायकोने माझ्यावर जबरदस्ती केली नसती तर कदाचित मी सामान आणायला गेलो नसतो. ही लॉटरी जिंकण्यात माझ्या पत्नीचा मोठा हात आहे.