रानावनात भटकणाऱ्या वन्य प्राण्यांना आपल्या आसपास मुक्तसंचार करताना पाहिलं, तर अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. पण काही प्राणी माणसांवर क्वचितच हल्ले करतात. कारण प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात. अशातच हत्ती सारखा प्राणी जंगलात भ्रमंती करत असेल तर त्याच्यापासून कोसो दूर राहिलेलंच बरं. पण एखाद्या वेळी हत्तीसारखा भलामोठा प्राणी वेदनेनं विव्हळत असेल, तर त्यालाही मानवताधर्माप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, असाच काहिसा प्रकार एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. एरव्ही जंगलात भटकणारा हत्ती दु:खाचं डोंगर घेऊन रुग्णालयात आला. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी तपासलं असता त्याचा X-ray काढण्यासाठी त्याला मशिनजवळ घेऊन गेले. हत्तीनंही आपण रुग्णच आहोत, असा प्रतिसाद देत डॉक्टरांना सहकार्य केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काही रुग्ण जेव्हा उपचारासाठी रुग्णालायत दाखल होतात, त्यावेळी अनेकदा काही जणांना हाताळणं डॉक्टरांना कठीण जातं. कारण असे रुग्ण डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करत नाहीत. हे तर माणसांच्या बाबतीत झालं. पण एखादा प्राणी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो. तेव्हा त्या प्राण्यासा सुरक्षितपणे उपचार देण्याचं आव्हानंही डॉक्टरांना असतं. पण हत्ती सारखा प्राणी जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा तो किती नम्रपणे डॉक्टरांच्या उपचारांना साथ देतो, हे क्वचितच तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणाऱ्या काही रुग्णांना या हत्तीने सभ्य वागणुकीचा एकप्रकारे धडाच शिकवला आहे.
इथे पाहा व्हीडीओ
कावेरी नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हत्ती रुग्णालयात आल्यानंतर तो एक्स रे च्या प्रक्रियेला कशी साथ देतो, हे या व्हिडीओत दिसत आहे. अतिशय नम्रपणे भला मोठा हत्ती रुग्णालयात येत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. डॉक्टरांनी त्याला एक्स रे मशिनजवळ नेल्यावर माणसांप्रमाणेच तो खाली बसतो आणि डॉक्टरांना सहकार्य करतो. एक्स रे साठी आलेला इतका समजदार रुग्ण तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल, याची मला खात्री आहे. असं कॅप्शन कावेरी नावाच्या युजरने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ५ हजार व्यूज याला मिळाले आहेत. तर शेकडो जणांना या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हत्तीचं रुग्णालयात दाखवलेली चांगली वागणूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं, रग्णालयात माणसंही इतकं सहकार्य करत नाहीत.