Viral video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी. अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहावर अशी वेळ आली आहे की पाहून तुमच्याही पाया खालची जमीन सरकेल. म्हणूनच आयुष्यात कधीच ताकदीचा गर्व करू नका, एक दिवस असाही येतो. सिंहाची अवस्था पाहून म्हणाल आयुष्यात अंतिम सत्य हेच आहे.

जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण तुम्हाला जर असं कुणी सांगितलं की मधमाशांनी एका सिंहाला हतब केलंय तर कदाचीत तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.सध्या सिंहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात सिंहाच्या अंगावर मधमाशांचे संपूर्ण पोळे ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. सिंहाची इच्छा असूनही मधमाशांपासून त्याला स्वत:ला वाचवता आले नाही. तो वेदनेने इकडे-तिकडे जंगलात भटकत राहतो आणि त्याच्या सर्व अंगावर मधमाश्या चिपकून राहतात. मधमाशा या आकाराने लहान असल्या तरी त्यांचा एक डंक इतका जीवघेणा असतो की यामुळे माणसाचे संपून शरीर सुजते. अशात त्यांचे संपूर्ण पोळेच राजाच्या अंगावर बसल्यावर त्याचे काय हाल झाले असावे याचा विचार करा.

पाहा व्हिडीओ

anil.beniwal29 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते”

Story img Loader