Viral video: हाथी मेरे साथी, हा बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट…हत्तीला आपण पूजतो, कारण हिंदू धर्मानुसार हत्ती म्हणजे गणरायाचं रुप…अशात हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण जर हा हत्ती पिसाळला तर तो सगळं नासधुस करुन सोडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्तीला पाहून पर्यटकांचा थरकाप उडाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा शहरात एक जंगली हत्ती घुसला आहे. तो धुडघुस घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या वनविभागाचे पथक हत्तीच्या सुटकेसाठी मोहीम राबवत आहे. मानवी वस्ती मध्ये हत्ती घुसल्याने सध्या या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जंगली हत्ती बारीपाडा येथील एमकेसी हायस्कूलच्या आवारात शेवटचा दिसला होता. शाळेच्या आवारात प्रवेश भिंत देखील त्याने तोडली.
आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर इतके भयंकर असतात की ते पाहून नेटकरीही हैराण होऊन जातात. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओदेखील असाच आहे. यामध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे एक विशाल हत्ती शहरी भागात घुसून नुकसान करत आहे. हत्तीच्या चारही बाजूनं लोक उपस्थित आहेत आणि तो मात्र सामानाची तोडफोड करण्यात व्यग्र आहे. लोक इच्छा असतानाही त्याला थांबवू शकत नाहीत. कारण हत्तीसोबत पंगा घेणं म्हणजे हातानं मृत्यूला आमंत्रण देणं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘छोट्या हत्ती’वर मोठा हत्ती! हा व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क
थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अशा प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत. त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी वाघांच्या जवळ जाऊ नये. जंगलातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना वनविभागाकडून पर्यटकांना दिल्या जातात.