आपल्या लांबलचक सुळ्यांसाठी ओळखला जाणाऱ्या भोगेश्वर हत्तीचं शनिवारी कर्नाटकमधील बंदीपुर व्याघ्र प्रकल्पामध्ये निधन झालं. गुंद्रे रेंजमध्ये हा देखणा हत्ती अखेरचा पहावयास मिळाला. वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हत्ती ६० वर्षांचा होता. वयोमानानुसार तो थकला होता तसेच त्याला अनेक आजारांनी ग्रासले होते असंही सांगण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये हा हत्ती फारच लोकप्रिय होता. या हत्तीला ‘मिस्टर काबिनी’ नावाने ओळखलं जायचं. तो अनेकदा बंदीपुर आणि नागरलोहच्या जंगलांमध्ये भटकंती करताना पर्यटकांना दिसायचा. अनेकदा त्याला पर्यटकांनी काबिनी नदीच्या डोहात डुंबताना पाहिल्याने त्याला ‘मिस्टर काबिनी’ नाव देण्यात आलेलं.

शासकीय नियमानुसार ‘मिस्टर काबिनी’वर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी त्याचे हस्तीदंत काढून घेण्यात आले असून ते संरक्षित म्हणून जतन केले जाणार आहेत. या हत्तीला शेवटचा निरोप देण्याआधी वन कर्मचाऱ्यांनी त्याच्या देहावर फुलं वाहून त्याची पुजाही केली.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि येथील स्थानिक आदिवासी लोकांनी या हत्तीला आधी भोगेश्वर नाव दिलं होतं. हा हत्ती अनेकदा बंदीपुर आणि नागरहोल येथील जंगलांमध्ये असणाऱ्या भोगेश्वर मंदिराजवळ दिसून यायचा.

भोगेश्वरच्या सुळ्यांची लांबी ही ८.५ फूट इतकी होती. त्याचे जुळे जवळजवळ जमिनीला लागायचे. तो नेहमीच त्याच्या या लांबलचक हस्तीदंतांमुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचा विषय राहिला. त्याचे सुळे जमिनीच्या बाजूला वाढताना एकमेकांना छेद देत असल्याने त्याला गवत खाताना अडचणींचा समान करावा लागायचा. विशेष म्हणजे भोगेश्वर हा जंगलामध्ये हत्तींच्या कळपामध्ये न राहता एकटाच भटकायचा. अनेकदा तो पर्यटकांना असा एकटाच भटकताना दिसायचा.

भोगेश्वर हा कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या नजरेतून सुटल्याने जिवंत राहिला असं सांगितलं जातं. वीरप्पनने १९८० ते १९९० दशकामध्ये हस्तीदंतांसाठी अनेक हत्तींची कत्तल केलेली. त्या काळात हस्तीदतांना मोठी मागणी होती. सत्यमंगलम वन क्षेत्रातून आणि कर्नाटमधील इतर जंगलांमधून हस्तीदंतांची तस्करी व्हायची. मात्र भोगेश्वर वीरप्पनच्या नजरेतून सुटला होता. भोगेश्वरच्या मृत्यूमुळे अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या फोटोसहीत भावनिक मजकूर पोस्ट करत या लाडक्या हत्तीला अखेरचा निरोप दिलाय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

वन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अनेक महितीपर चित्रपटांमध्ये या हत्तीला दाखवण्यात आलाय. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे केवळ सहा ते सात हत्ती सध्या बंदीपुर आणि नीलगिरीच्या जंगलांमध्ये उरलेत असं वन अधिकारी सांगतात.