जंगल म्हटलं की त्यात प्राणी हे आलेच. मात्र कधीकधी जंगलात असे देखील प्राणी दिसतात ज्यांना आपण याआधी कधीही पाहिलेलं नसतं. जेव्हा हे प्राणी अचानक आपल्याला दिसतात तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होतं. अशाच एका प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो जंगलात फिरताना दिसत आहे. त्याची लांब शेपटी आहे आणि एक विचित्र शरीर आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची सोंड हत्तीसारखी आहे.
तुम्ही हा प्राणी पाहिला आहे का?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा प्राणी गवत आणि झुडपांमध्ये फिरत आहे. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हालाही समजणार नाही की त्याचे पाय कुठे आहे आणि डोके कुठे आहे. त्याचा आकार विचित्र आहे आणि शेपटीवर बरेच केस आहेत जे लांब दिसत आहेत. विशेष म्हणजे या प्राण्याची सोंड हत्तीसारखी लांब आहे. या प्राण्याचा व्हिडीओ बर्याच लोकांनी पाहिला असेल किंवा वाइल्ड लाईफ सफारी दरम्यान या प्राण्याला पाहिलं असेल, पण ज्यांनी पाहिला नाही त्यांना सांगायचं म्हणजे हा एक मुंग्या खाणारा प्राणी आहे.
मुंग्या खाणारा प्राणी..
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)
हे प्राणी मुंग्या खातात. त्यांचे टोकदार तोंड आणि २ फूट लांब पातळ जीभ त्यांना मुंग्या पकडून खायला मदत करतात. त्यांचे वजन जवळपास ४० किलो असते. त्याच्या पायाची नखे चाकूपेक्षा धारदार असतात. ते एका दिवसात ३० हजारांहून अधिक मुंग्या खातात. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८८ हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.