फक्त सिंहाचं नाव जरी घेतलं तरी अंगाला घाम फुटतो. सिंहांच्या खतरनाक शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहून तर आपला अर्धा जीव तसाच जातो. पण जरा विचार करा जर का सिंह थेट तुमच्या गाडीसमोरच आला तर? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल.

सोशल मीडियावर या सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जंगल सफारीबाबत नेहमीच अनेकांना कुतूहल वाटतं. काहींनी याबाबतचा अनुभव घेतलाही असेल. विस्तीर्ण पसरलेल्या वनराईमध्ये वावरणाऱ्या वन्यजीवांना पाहण्य़ाची संधी य़ा सफरीच्या निमित्तानं मिळते. वाघ आणि सिंहाचं दर्शन या सफारीत झाल्यानंतर तर अनेकांचाच आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. पण, ही सफारी प्रत्येक वेळी आनंद देणारीच असेल असं नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : बंदुकीचा धाक दाखवून बाईक चोरी करू लागले, पण काही मिनिटांतच चित्र उलटलं, पाहा VIRAL VIDEO

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह पर्यटकांच्या गाडीच्या अगदी जवळ गेल्याचं पाहायला मिळत आहे. सिंहाला इतक्या जवळून पाहिल्यानंतर सगळेच घाबरले आहेत. पर्यटकांसोबतच त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सुरक्षारक्षकही घाबरून गेलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रॅकर सीटवर बसलेली व्यक्ती सिंहाला पाहून खूप घाबरली आहे. पण, सिंहाच्या उपस्थितीत कोणीही त्याच्या जागेवरून हलत नाही.

आणखी वाचा : या ‘छोटी दीपिका’ने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ, एक्स्प्रेशन्स पाहून Ranveer Singh सुद्धा वेडा झाला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्ता आडवायला झोपून घेतलं, मग चालकाने काय केलं यावर विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO

प्रत्येकजण अतिशय हुशारीने कोणतीही हालचाल न करता स्तब्ध राहतात. त्यामुळे सिंहाला कोणत्याच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रत्येकजण या व्हिडीओला प्रचंड लाइक आणि शेअर करत आहे. यासोबतच वन्यजीव सहलीदरम्यान सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन कमेंट बॉक्समध्ये करण्यात आले आहे.