तंत्रज्ञानाच्या मदतीने जग खूप प्रगत झाले आहे; शिवाय सध्याचा काळ हा ऑनलाइन आहे. त्यामुळे आजकाल आपली अनेक कामे घरात बसून करता येतात. पूर्वी जर कोणाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर ती दुकानात जाऊन खरेदी करावी लागत असे; पण आता ते घरी बसूनही सर्व काही खरेदी करू शकतात. विविध ऑनलाइन कंपन्यामधील डिलिव्हरी बॉय आपण मागवलेल्या वस्तू घरी पोहोचवतात.
ऑनलाइन शॉपिंगद्वारे तुमचे मित्र किंवा नातेवाईकही काही वस्तू तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकतात. त्यामध्ये अनेकदा वाढदिवसानिमित्त तुमचे जवळचे लोक तुम्हाला गिफ्ट देऊन सरप्राईजही देतात. अशा घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे याआधीही तुम्ही पाहिले असतील. पण, तुम्ही कधी डिलिव्हरी बॉयचा दुसऱ्या व्यक्तीवरील राग काढण्यासाठी वापर केला गेल्याचे पाहिले आहे का? नक्कीच तुमचे उत्तर नाही, असे असू शकते. परंतु, सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एका मुलीने आपल्या जुन्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा उपयोग केल्याचे पाहायला मिळत आहे. हे पाहून तुम्हालाही हसू आवरणे कठीण होऊ शकते.

व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

तुम्ही आजपर्यंत ऑनलाइन खरेदीमध्ये अनेक घरगुती वस्तू ऑर्डर केल्या असतील; पण तुम्ही कोणासाठी ऑनलाइन चापट ऑर्डर केली आहे का? हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटू शकते; शिवाय ऑनलाइन चापट कशी ऑर्डर कशी ऑर्डर करता येऊ शकते, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक मुलगा घरातून बाहेर पडताच डिलिव्हरी बॉय त्याच्याजवळ येतो आणि त्याला नाव विचारतो आणि लगेच दोन चापट मारून त्याची सही घेऊन निघून जातो. तो यावेळी त्याच्यासाठी ऑर्डर केलेली चापट देऊन गेल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर पद्धतीने बनवण्यात आला आहे; जो पाहून अनेकांना आपले हसू आवरणे कठीण झाले आहे.

हेही पाहा- वेळेला चहा हवाच…! चहा बनवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, व्हायरल VIDEO पाहून आठवतील हॉस्टेलमधील दिवस

या अनोख्या चापट डिलिव्हरीचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आजकाल कशातही ऑनलाइन डिलिव्हरी केली जाऊ शकते.” तर व्हिडीओमध्ये ही ऑर्डर तुमच्या जुन्या प्रेयसीने पाठवली आहे, असे लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. हा मजेशीर व्हिडीओ आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे; तर अनेक जण त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.