Shocking video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सौरभ हत्याकांडाची सध्या देशभरात तर्चा सुरु आहे. त्यातच आता तेथील एक प्रकरण समोर आलं आहे जिथे पत्नीने भांडणानंतर पतीला अशाच प्रकारे भयानक हत्या करण्याची धमकी दिली. पतीनं आपल्या पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यामुळे महिलेने भांडणादरम्यान पतीला म्हटलं की, मेरठ हत्याकांडप्रमाणे तुलाही कापून ड्रममध्ये भरेन. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशात एका महिलेने तिच्या पतीच्या शरीराचे अवयव कापून ड्रममध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे, हे कृत्य मेरठमध्ये अलिकडेच झालेल्या भयानक हत्येसारखेच आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मूळचे झाशीचे रहिवासी असलेले आणि सध्या गोंडाच्या जल निगममध्ये काम करणारे कनिष्ठ अभियंता धर्मेंद्र कुशवाह यांनी त्यांची पत्नी माया मौर्य आणि तिचा प्रियकर नीरज मौर्य यांच्यावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कुशवाह यांनी सांगितले की त्यांनी २०१६ मध्ये बस्ती जिल्ह्यातील रहिवासी माया मौर्य यांच्याशी प्रेमविवाह केला होता.
कुशवाहाने सांगितले की त्याने २०२२ मध्ये मायाच्या नावाने जमीन खरेदी केली आणि घर बांधण्याचे कंत्राट तिचा नातेवाईक नीरज मौर्य याला दिले. याच काळात माया तिच्या नीरज मौर्यच्या जवळ आली आणि कोविड-१९ काळात नीरजच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांचे नाते अधिक घट्ट झाले, असेही त्यांनी सांगितले. कुशवाहाने असा दावा केला की त्याने ७ जुलै २०२४ रोजी माया आणि नीरजला नको त्या अवस्थेत मी पाहिले आणि त्याने विरोध केला तेव्हा माला मारहाण करण्यात आली आणि माया घराबाहेर पडली. माया २५ ऑगस्ट २०२४ रोजी नीरजसोबत घरी परतली आणि जबरदस्तीने कुलूप तोडून आत गेली. त्यानंतर पुन्हा ती १५ ग्रॅम सोन्याची साखळी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली.कुशवाहाने १ सप्टेंबर २०२४ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली.
२९ मार्च २०२५ रोजी मायाने त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याने विरोध केला तेव्हा तिने तिचा प्रियकर नीरजसह आई आणि मुलाला मारहाण केली.”यादरम्यान, माया म्हणाली की जर तू जास्त बोललास तर मी तुला मेरठ हत्याकांडाप्रमाणे कापून ड्रममध्ये भरेन,” असे कुशवाहाने दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
या घटनेतील पत्नीने देखील आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीचे तिच्या एका बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेस तिचा पती तिला घटस्फोट देण्याची धमकी देत असून तो तिच्याच एका बहिणीशी लग्न करण्याच्या विचारात असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. शनिवारी दोन्ही पक्षांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि चौकशीनंतर नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.