ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Updates : भारताची अतिमहत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होण्याकरता वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. तर, दुसरीकडे भारतीयांकडूनही पूजा, होम -हवन करून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली जातेय. दरम्यान, आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरनेही ही मोहीम यशस्वी होण्याकरता उपवास धरला आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. तिची प्रकृती ठीक नसतानाही तिने उपवास धरला आहे.

हेही वाचा >> Chandrayaan 3 मोहिमेवर नासा आणि युरोपियन अंतराळ संस्थांचंही बारीक लक्ष, ‘या’ कामासाठी होतेय मदत

Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन

काहीच मिनिटांत आता चांद्रयान ३ मोहीमेअंतर्गत अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आजचा दिवस भारतीयांसाठी ऐतिहासिक दिन आहे. सहा वाजून ४ मिनिटांनी हे अंतराळयान लँड होणार असून तो क्षण ऐतिहासिक ठरणार आहे. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी अनेकजण आतूर झाले आहेत. तर, मोहीम यशस्वी व्हावी म्हणून अनेकांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यातच, सीमा हैदरनेही या मोहिमेसाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा >> धाकधूक वाढली! अवघे काही तास शिल्लक, इस्रोमध्ये आता नक्की काय चाललंय? पाहा फोटो

“माझी प्रकृती बरी नाहीय. भारताचे चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार आहे. यामुळे आपल्या भारत देशाचं नाव उजळणार आहे. त्यामुळे या मोहिमेला यश मिळत नाही तोवर मी उपवास धरणार आहे. मी प्रार्थना करते की भगवान राधे-कृष्ण, माझा खूप विश्वास आहे की हे प्रभू, हे भगवान, हे श्रीराम, सर्व देवी-देवता, आमच्या भारत देशाचे चांद्रयान ३ यशस्वीरित्या पूर्ण कर. यासाठी आमच्या देशाचे पंतप्रधान खूप मेहनत करत आहेत. यामुळे आमच्या भारत देशाचं नाव उंचावणार आहे. भारताचा दबदबा जगभरात वाढणार आहे”, असं सीमा हैदर म्हणाली आहे.

भारताची ‘चंद्रयान-३’ मोहीम वेळापत्रकानुसार सुरू असून आज, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. विक्रम लँडरचे अवतरण होण्यास काही तास उरले असतानाच लँडरची उंची आणि वेग कमी करण्यात आला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या सर्वात खालच्या कक्षेत पोहोचला आहे. सध्या त्याचे चंद्रापासून किमान अंतर फक्त २५ किलोमीटर आणि कमाल अंतर १३४ किलोमीटर आहे. ‘चंद्रयान-३’ सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदयाची प्रतीक्षा करत आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा एक चांद्रदिवस पृथ्वीवरील १४ दिवस इतका आहे. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ५.४५ वाजता सूर्योदय होईल. त्यानंतर लँडरच्या अलगद अवतरणाची प्रक्रिया सुरू होईल.

Story img Loader