महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह राहतात. या वर्षात त्यांचे अनेक ट्विट्स आणि पोस्ट व्हायरल झाले आहेत. ते नेहमीच तरुण पिढी आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टींना प्रेरणा देत असतात. देशात सुरू असलेल्या चांगल्या कामाचंही ते कौतुक करतात. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे एक विनंती केली आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक नदी वाहत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे व्हिज्युअल खूपच सुंदर आहेत. हा व्हिडिओ टॅग करून आनंद महिंद्रा यांनी थेट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाच प्रश्न विचारला आहे.
आनंद महिंद्रा यांनी १३ जून रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ६ सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. हा व्हिडिओ खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जाणारी वाहने आणि पुलावरून वाहणारी नदी पाहू शकता. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. व्हिडिओमधील हे दृश्य खूपच सुंदर दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत लिहिले आहे की, ‘थांबा…? नितीन गडकरीजी आपणही असे करू शकतो का? असा सवाल त्यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – सलाम तुमच्या कार्याला! भारतीय जवानांचा नवा Video व्हायरल, बघून अंगावर येईल काटा…
आनंद महिंद्राने शेअर केलेल्या या व्हिडिओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर ट्विटर यूजर्सही जबरदस्त रिप्लाय देत आहेत. पण यूजर्स नितीन गडकरींच्या उत्तराची वाट पाहत आहेत.