आजकाल अनहेल्दी फूड खाणे ही अनेक लोकांच्या जीवनशैलीचा भाग झाले आहे. तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, पॅकबंद पदार्थ खाणे हे अनेकांसाठी सामान्य गोष्ट आहे. पण या सर्वाचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होईल याची पर्वा कोणीच करत नाही. रस्त्यावरील स्टॉलवर, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन विविध पदार्थांवर ताव मारतात. सोशल मीडियावर नवीन खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ चर्चेत येत असतात.अशाच सध्या बर्फाचा गोळा विकणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील बर्फाचा गोळा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून आकर्षण आणि चिंता दोन्ही निर्माण झाली आहे.
९ एप्रिल रोजी इंस्टाग्राम फूड व्लॉगर ‘फूडीक्रू’ ने हा व्हिडिओ खाद्यप्रेमींसाठी शेअर केला आहे. फूड व्लॉगरने क्लिपला “एपिक फ्रूट गोला” असे कॅप्शन दिले. अहमदाबादच्या चांदखेडा परिसरातील ओएनजीसी सर्कलजवळील ग्रेट काश्मीर बर्फाचा गोळा विक्रेत्याच्या स्टॉलवर जातो. या गोळा विक्रेत्याकडे इतर रंगांचे पर्याय असल्याचे होते, ज्यांना तो fruit flavours असे नाव देतो. चमकदार निळ्या आणि निऑन हिरव्यापासून ते गडद नारंगीपर्यंत, प्रत्येक गोळ्यासाठी वेगळे सरबत वापरले होते आणि त्यावर विविध फळे देखील टाकली होती. स्टॉलवर कैरी आंबा, किवी, बेरी आणि डाळिंब असे fruit flavoursमध्ये गोळा उपलब्ध आहे. रीलमध्ये काही सेकंदातच, त्या माणसाने सर्जनशीलता दाखवली. त्याने सरबत आणि फळांच्या तुकड्यांपासून एक सुंदर दिसणारा गोळा तयार केला. ज्यात एक मोठा पांढरा बर्फाचा गोळा एका सरबतामध्ये बुडवला जातो. काही सेकंदातच, बर्फाळ गोला गडद जांभळा रंग घेत होता. त्यानंतर कागदी वाटीत तो गोळा ठेवून त्यावर सरबत चमच्याने पुन्हा ओतले जाते. कैरी, आंबा, जांभुळ अशा विविध फळांचे सरबत ठेवले आहे ज्यात बर्फाळा गोळा बुडवला जात आहे. त्यावर त्या फळांचे सरबत ओतले जाते. त्यानंतर त्यावर मलाई, चाट मसाला टाकला जातो त्यानंतर एका प्लेटमध्ये किसलेला बर्फ घेतो त्यावर विविध फळांच्या तुकड्यांसह त्याचे सरबत टाकतो. त्यावर मलाई आणि ड्रायफ्रुट्स टाकतो.
नेटकरी काय म्हणाले?
या व्हिज्युअल ट्रीटने अनेकांना भुरळ घातली असली तरी काहींनी घटकांच्या यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. या सरबतामध्ये साखर आणि कृत्रिम रंग जास्त प्रमाणात वापरले जाते त्यामुळे असा गोळा खाल्यावर आरोग्यावर काय परिणाम होईल याबाबत अनेकानी चिंता व्यक्त केली.
“कर्करोग फक्त एक महिना दूर आहे,” एका वापरकर्त्याने खिल्ली उडवली.
दुसऱ्या वापरकर्त्याने “आता जीव घेणार का” या नाट्यमय पद्धतीने ही भावना व्यक्त केली.
तिसरा म्हणाला की, “कृत्रिम रंगांमध्ये असलेले फळांचे तुकडे थोडे नैसर्गिक बनवले आहे”
या व्हिडिओला ५ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि नऊ लाख लाईक्स मिळाले आहेत.