Viral video: आपल्या देशात एका पेक्षा एक जुगाडू भरले आहेत. ही मंडळी अशा अशा जुगाडू गोष्टी तयार करतात की ज्या पाहून काय बोलावं हेच कळत नाही. हल्ली नानातऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून रिक्षाशी संबंधित व्हिडीओ तर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षातून अनेकांनी कित्येकवेळा प्रवास केला असेल, जास्त भाडे सुध्दा भरले असेल. परंतु रिक्षात फक्त इकडून तिकडे जाण्याची सुविधा असते. तुम्हाला आम्ही एक अशी रिक्षा दाखवत आहे. त्यामधून तुम्ही कधी प्रवास केला आहे का ? त्यामध्ये तुम्हाला चक्क बिअर मिळणार आहे. हा व्हि़डीओ एका रिक्षाशी संबंधीत आहे. जो डोंबिवलीमधील असल्याचं सांगितलं जातंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही अशा रिक्षात बसला नसाल तर त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या रिक्षामध्ये दारूच्या असंख्य बाटल्या तुम्ही पाहू शकता. या प्रकाराला रिक्षा वाईन शॉप असं म्हटलं जात आहे. ही रिक्षा मुंबईतील डोंबिवली या भागातील असल्याचं म्हटलं जातंय. पण याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण आसपासचं वातावऱण आणि साईबाबांची मुर्ती पाहाता ही रिक्षा मुंबईमधीलच असावी अशी शक्यता आहे.

या रिक्षाला पूर्णपणे लाईट लावण्यात आली आहे. तसेच रिक्षाच्या सीटच्या बाजूला तसेच, पुढच्या बाजूला देखील वाईनच्या लहान-मोठ्या बाटल्या सजवलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या रिक्षाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> …अन् थेट गाडीवर चढला चित्ता; धडकी भरवणारा ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

हा व्हिडीओ yogesh.gajjar.902266 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फक्त मनोरंजनाच्या उद्दशेनं हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wine shop in auto rickshaw in mumbai dombivali video viral on social media trending on internet srk