काही दिवसांपूर्वी १२ फेल चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन दर्शवले होते. परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याना करावा लागणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य असेच आहे. IIT, JEE आणि Union Public Service Commission (UPSC) परीक्षा या भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. देशभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी त्यात सहभागी होतात. देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जाणाऱ्या, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियोजन करावे लागते, लक्ष्य केंद्रित करावे लागते आणि त्यासाठी शिस्तबद्ध दृष्टिकोनाची गरज असते. नुकताच एक्सवर सोशल मीडियावर एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक दिसत आहे. हे वेळापत्रक पाहून लोकांना धक्का बसला आहे.
मिस्टर (@shrihacker) नावाने अकांऊटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका विद्यार्थ्याचेवेळापत्रक दिले आहे. फोटो शेअर करताना लिहिले आहे की, “जवळच्या मित्राचे वेळापत्रक आहे जो जेईईच्या परिक्षेची तयारी करत आहे. परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या व्यक्तीचे वेळापत्रक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.”
हेही वाचा – भन्नाट जुगाड! भावडांनी कारचे बनवले हेलिकॉप्टर; हवेत उडवण्याआधीच स्वप्नांवर फिरले पाणी, Video Viral
झोपायला फक्त साडेचार तास
टाइम टेबलचा स्क्रीनशॉट त्याच्या दैनंदिन कामासाठी, झोपेसाठी आणि अभ्यासासाठी दिलेला वेळ दर्शवतो. जेईईची तयारी करणारा हा तरुण मध्यरात्री झोपल्यानंतर दररोज पहाटे साडेचार वाजता उठतो. तो फक्त ४.५ तास झोपतो. उर्वरित दिवस उजळणी करण्यात, क्लासमध्ये अभ्यास करतो आणि त्यांनतर गृहभ्यास करतो, नोट्स काढतो. सुट्टीसाठी किंवा इतर कामांसाठी क्वचितच वेळ असतो. स्वतःला प्रेरित करण्यासाठी, विद्यार्थ्याने शेड्यूलच्या खाली एक प्रेरणादायी कोट देखील लिहिले ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘तुम्हाला हा दिवस पुन्हा कधीही मिळणार नाही, म्हणून तो मोजा.’
वेळापत्रक पाहून नेटकरी चिंतेत
पोस्ट शेअर करणाऱ्या युजरने पुढे लिहिले की, “त्याचा मित्र टाइम टेबल अतिशय काटेकोरपणे फॉलो करतो आणि त्याच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचा दृढनिश्चय पूर्ण करतो.” त्याच्या पोस्टला प्रतिसाद देताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, खूप व्यस्त आहे… व्यायामसाठी वेळ नाही. दुसऱ्याने टिप्पणी दिली, “हे चांगले वाटते, विशेषतः ती आवश्यक झोप.” मी दिवसाची सुरुवात ध्यान / धावणे आणि नंतर३० मिनिटांसाठी काही खेळ खेळण्याची शिफारस करतो. हार्दिक शुभेच्छा. तिसऱ्याने लिहिले, वैद्यकीय पुरावे असे दर्शवतात की, पौगंडावस्थेतील ७-८ तासांपेक्षा कमी झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होते, शिकण्याची क्षमता कमी होते आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य कमी होते.