हे वर्ष संपायला फक्त काही दिवसच उरले आहेत. लोक आता वाट पाहातायत ती न्यु ईअरची. पण त्यापूर्वी यावर्षीच्या काही हाईलाटवर नजर टाकूयात. या वर्षी सोशल मीडियावर अनेक लोक चर्चेत होते जे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले. या यादीतीत मुलींचा सर्वाधीक समावेश आहे. काही सोशल मीडियाचा वापर संपर्कासाठी करतात तर काही जण व्हिडीओ आणि रील पाहण्यासाठी करतात. काहीजण स्वतःचे व्हिडीओ बनवून प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. बऱ्याच वेळा मेकअपचे व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक व्हिडीओंमध्ये तर मेकअप करण्याच्या खास टिप्स दिल्या जातात. इथे प्रत्येकाला मेकअप करून सुंदर दिसायचे असते.
अशाच एका तरुणीचा एक मेकअप टिप्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि विशेष म्हणजे २०२३ मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला हा व्हिडीओ आहे. तर जाणून घेऊयात या व्हिडीओमध्ये असे काय आहे की, जो व्हिडीओ इतका जास्त व्हायरल झाला. टीकटाॅक डाटाच्या रिपोर्टनुसार हा ५०४ मिलियन लोकांनी व्हिडीओ बघितला आहे.
सावळ्या रंगाला नेहमीच वाईट समजलं जातं. सावळ्या रंगांच्या लोकांना ये काळ्या असं म्हणून हिणवलं जातं. अशा बोलण्यांमुळे अनेकांना अनेक प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. काहींना तर यामुळे डिप्रेशन सुध्दा येतं. काही लोक तर अनेकांच्या टोमण्यांमुळे गोरा रंग मिळवण्यासाठी हजारो रूपयांच्या क्रिम बाजारातून विकत घेतात. या उटल काही असेही लोक आहेत जे स्वत:वर प्रेम करतात. आपण जसे आहोत तसे बेस्ट आहोत या आत्मविश्वासानं ते समाजात वावरतात. त्यामुळे या तरुणीचा रंग जरी सावळा असला तरी तिचा आत्मविश्वास लोकांना आवडल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> एकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? कपलचा VIDEO पाहून सगळेच गोंधळले
मार्च २०२३ मध्ये व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दाखवण्यात आलीये. ही मुलगी मेकअप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मेकअप करत असणाऱ्या मुलीचा रंग डार्क दिसतोय. ती अनेक उत्पादने आपल्या चेहऱ्याला लावताना दिसत आहे. तिने डोळ्यांचा देखील खास मेकअप केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.