Viral Video: आयुष्यातील अनेक सुंदर क्षणांपैकी वाढदिवस साजरा करणं हा देखील प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण समजला जातो. त्यात जर आपल्या वाढदिवशी इतरांनी सरप्राईज दिलं म्हणजे तो दिवस आणखी आनंदात जातो. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात आईसोबत विमानात प्रवास करणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला वाढदिवसाचे सरप्राईज दिले. इतकंच नव्हे तर हे सरप्राईज देण्यासाठी त्याला विमानातील क्रू मेंबर्सनी मदत केली.
मुलाने विमानात दिलं आईला वाढदिवसाचं सरप्राईज
हा व्हिडीओ फ्लाइटचे क्रू मेंबर असलेले अफजल खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर लिहिलंय की, “तो मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की, आज त्याच्या आईचा वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त त्याला सरप्राईज द्यायचे होते. त्यानंतर आम्ही संपूर्ण फ्लाइटमध्ये टाळ्या वाजवून त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.”
व्हिडीओ नक्की बघा…
या व्हिडीओमध्ये तो मुलगा क्रू मेंबर्सला आईला सरप्राईज देण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. त्याच्या विनंतीनंतर फ्लाइट कॅप्टनने माइकवर सर्वांसमोर त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इतर क्रू मेंबर्सने त्याच्या आईला गिफ्ट म्हणून चॉकलेट आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिलेलं पत्र दिलं. त्यानंतर संपूर्ण फ्लाइटमधील प्रवाशांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या.
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या अफजल खानने त्याच्या पोस्टखालील कॅप्शनमध्ये, “…आणि आम्ही एकाच्या सुंदर दिवसाला आणखी खास बनवलं” असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून युझर्स फ्लाइट मेंबर्स आणि मुलाचं कौतुक करत आहेत.