काही लोकांच्या नशिबात आयुष्यभर कष्ट असतात, तर काही सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी जन्माला आल्यानंतर दोनच दिवसात करोडपती झाली आहे. आलिशान घर, महागड्या गाड्या, नोकर-चाकर हे सगळं तिच्या नावावर झालं आहे. हे सर्वकाही तिला तिच्या श्रीमंत आजोबांकडून मिळालं आहे. या घटनेतीलआजोबांनी नातीचा जन्म होताच पुढील ४८ तासात तिच्यावर पैशांचा वर्षाव केला आहे. आजोबांनी नातीच्या नावावर ५० कोटींहून अधिक रुपयांचा ट्रस्ट फंडदेखील केला आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या बैरी ड्रिविट-बार्लो नावाच्या व्यक्तीच्या लेकीने एका मुलीला जन्म दिला आहे. बैरी यांनी नातीच्या जन्मानंतर इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. तसेच नातीला करोडो रुपयांचे घर आणि ट्रस्ट फंड भेट दिल्याचं सांगितलं.

हेही वाचा- बकऱ्यासाठी १ कोटींची बोली, तरीही मेंढपाळाचा विक्रीस नकार, आयुष्य बदलवणाऱ्या ऑफरवर का सोडलं पाणी? जाणून घ्या

नातीला दिलं १० कोटींचं आलिशान घर –

५१ वर्षीय बैरी यांनी त्यांच्या नातीला तब्बल १० कोटी रुपयांचे आलिशान घर आणि सुमारे ५२ कोटी रुपयांचा ट्रस्ट फंड दिला आहे. इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा आणि नातीचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “आज माझी २३ वर्षांची मुलगी सैफ्रन ड्रिविट-बार्लोने एका मुलीला जन्म दिला. आम्ही खूप आनंदी आहोत.” शिवाय नातीच्या नावावर केलेलं घरं मागील आठवड्यात विकत घेतले होतं, असंही बैरी यांनी सांगितलं.

कोण आहे बैरी ड्रिविट-बार्लो?

हेही वाचा- या’ बकरीचे नाव ऐकून तुम्हाला करोनाचा ‘तो’ भीषण काळ आठवेल; तरीही लोक लाखोंची लावतायत बोली

बिझनेसमन बैरी यांनी इंस्टाग्रामवर स्वत:ला एक कलाकार म्हटलं आहे. एका अहवालानुसार तो १६०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहे. बैरी आपल्या कुटुंबाला करोडोंच्या भेटवस्तू दिल्याने चर्चेत असतो. गेल्या वर्षी त्यांनी ४ दशलक्ष पौंड खर्च केले होते. ख्रिसमसलाही ते खूप खर्च करतात. बैरी समलिंगी असून १९९९ मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे त्यांच्या घरी आगमन झाले होते. यानंतर २०१९ मध्ये बैरी हे त्यांचा पार्टनर टोनीपासून वेगळा झाला. आता त्यांची मुलगी सैफ्रनने एका मुलीला जन्म दिला आहे, ज्याच्या खुशीत बैरी यांनी करोडोंची मालमत्ता नातीच्या नावावर केली आहे. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Story img Loader