सोशल मीडियाच्या काळात एखाद्याचे नशीब कसे बदलेल हे सांगता येणं कठीण आहे. याच सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार्स झाले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे खाबी लेम. काहीही न बोलता केवळ आपल्या हावभावांचा वापर करून त्याने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. हे व्हिडीओ नेटकऱ्यांना इतके आवडले की इटलीच्या एका कारखान्यात कामगार म्हणून काम करणारा खाबी आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाला आहे. मात्र तुम्हाला त्याच्या सध्याच्या कमाईचा आकडा माहित आहे का?
खाबी लेम हा लाईफ हॅक व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध असून तो त्याच्या विशेष ‘खाबी मूव्ह’साठी ओळखला जातो. फॉर्च्युनसोबतच्या एका विशेष कार्यक्रमात, खाबीचे मॅनेजर अॅलेसॅंड्रो रिगिओ यांनी सांगितले की २२ वर्षीय खाबी त्याच्या लोकप्रियतेमुळे १० मिलियन डॉलर कमावण्याच्या मार्गावर आहे. सध्या २२ वर्षीय खाबी लेमचे सोशल मीडियावर जवळपास २०० दशलक्ष फॉलोवर्स आहेत.
अलीकडेच मिलान फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालण्यासाठी ह्यूगो बॉसने खाबीला ४ लाख ५० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास साडेतीन कोटी रुपये दिले होते. यासंबंधीची एक क्लिप त्याला त्याच्या टिकटॉक अकाउंटवर पोस्ट करायची होती. तसेच, द फॉर्च्युनने पुढे सांगितले की एका टिकटॉक व्हिडीओसाठी त्याला हॉलिवूडच्या एका मोठ्या स्टुडिओमधून तब्बल ७ लाख ५० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ६ कोटी रुपये देण्यात आले होते.
अॅपलचे वेड! IPhone 14 Pro खरेदीसाठी त्याने गाठली दुबई; तिकीटाच्या पैशात आले असते दोन भन्नाट फोन
दरम्यान, एका रिपोर्टनुसार इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या २५ सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली हा एकमेव आशियाई व्यक्ती आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २१४ मिलियन फॉलोवर्स असून तो त्याच्या प्रत्येक पोस्टसाठी तब्बल १० लाख ८८ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ८.६९ कोटी रुपये घेतो.