Wolf terror in Uttar Pradesh Video : मागील काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये श्वानांनी लोकांवर हल्ला केल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ, बातम्या समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत अनेकांच्या मृत्यूच्या घटनादेखील घडल्या. पण, उत्तर प्रदेशातील ३५ गावं चक्क लांडग्यांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आतापर्यंत या नरभक्षक लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ दिवसांत जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेतील एका नरभक्षक लांडग्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. या लांडग्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बइराइच जिल्ह्यातील ३५ गावांत या नरभक्षक लांडग्याने दशहत माजवली आहे, ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे; यात सहा मुलांचा समावेश आहे. नरभक्षक लांडग्याला पकडण्यासाठी वन विभागाची २५ पथके तैनात केली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी एका लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले आहे. यापूर्वी वन विभागाने तीन लांडग्यांना पकडले होते, चौथ्या लांडग्याला गुरुवारी पकडले.

हेही वाचा – ‘ही’ आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला! संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्; अंबानी, अदानींना देतेय टक्कर

लांडग्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. सकाळी अकराच्या सुमारास त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. आतापर्यंत चार लांडग्यांना पकडण्यात यश आले आहे, ज्यातील दोन लांडग्यांचा मृत्यू झाला. पण, वनविभागाच्या म्हणण्यानुसार, दोन लांडग्यांचा मुक्त वावर सुरू आहे, यामुळे ३२ गावांमध्ये रेस्क्यू पथक तैनात केली आहेत, काही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे वन अधिकारी आणि कर्मचारी गावात तैनात करण्यात आले आहेत.

लांडग्यांना पकडण्यासाठी १६ पथके तैनात (Wolf terror in Bahraich)

लांडग्याला पकडण्यासाठी १२ जिल्हास्तरीय अधिकारीही विविध गावांत तळ ठोकून आहेत. लांडग्याला पकडले जाईपर्यंत अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रेणू सिंह तळ ठोकून राहतील. डीएफओ बाराबंकी आकाश बधवान आणि डीएफओ नवीन प्रकाश हेदेखील ‘ऑपरेशन भेडिया’ सुरक्षितपणे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. लांडगे पकडण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. ड्रोन आणि थर्मल ड्रोनचा वापर करून मॅपिंग केले जात आहे. 

नरभक्षक लांडग्यांमुळे सारं गाव भयभीत

लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे उत्तर प्रदेशातील जवळपास ३५ गावं भीतीच्या छायेखाली जगत आहेत. दरम्यान, लांडगा हा कळपात राहणारा प्राणी आहे. एखाद्या प्राण्यामुळे त्याला धोका आहे असे वाटल्यास ते त्यावर कळपाने हल्ला करतात. ४२ दात असलेल्या या प्राण्याचा जबडा मजबूत असतो, यामुळे तो शिकार केलेल्या प्राण्याची हाडेदेखील तोडून खाऊ शकतो.

Story img Loader