विमान प्रवास आणि त्यातही पहिलावहिला विमान प्रवास हा प्रत्येकाच्याच आयुष्यात असंख्य आठवणी आणणारा असतो.विमानानं एका आठवड्यातून तुम्ही किती वेळा प्रवास करता? असा प्रश्न विचारल्यास प्रथम तर तुमचे डोळे चमकतील. कारण, विमान ही काही रोज प्रवासाला वापरण्याची गोष्ट आहे का, असंच तुम्हीही म्हणाल. त्याची कारणं तुम्हालाही ठाऊकच आहेत. प्रवासी म्हणून आपण एकाच ठिकाणी तासनतास बसून वैतागतो प्रवासादरम्यान आपण कंटाळलो की सहसा काहीतरी वाचतो, खिडकीतून बाहेर पाहतच बसतो, मोबाईलमध्ये गेम खेळतो, एखादा चित्रपट किंवा काहीतरी व्हिडीओ पाहतो.
मात्र विमानात प्रवासाचा कंटाळा आला म्हणून आता एवढा वेळ करायचं काय असा विचार करुन एका महिलेने चक्क विमानात एक सुंदर काम केलं आहे, हे पाहून तुम्हीही या महिलेचे कौतुक कराल.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला विमानात बसली आहे. तिची ६तासांची फ्लाईट आहे. आता ६ तास विमानाच्या प्रवासात काय करणार म्हणून ती मेहंदी काढायला घेते. ती संपूर्ण हातावर मेहंदी काढते. ती स्वत:च्या हातावर इतकी सुंदर मेंहदी काढते की तुम्हीही पाहतच राहाल, मेहंदी ज्यांना काढायला आवडते अशा मुलींच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस उतरला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर नाचणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचा मृत्यू? नेमकं सत्य काय, वाचा!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत. वो स्त्री वो कुछ भी कर सकती है अशीही एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे.