युनायटेड किंग्डममधील व्हेनेसा ब्राउन नावाच्या एका ५० वर्षीय इतिहास शिक्षीकेला चक्क स्वतःच्या मुलीचा आयपॅड ‘चोरल्या’ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पालकत्वावरून मुलीबरोबर वाद झाल्यानंतर त्यांनी मुलाचा आयपॅड काढून घेतला होता ‘द गार्डियन’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ब्राउन यांना या प्रकरणी २६ मार्च रोजी सुमारे साडेसात तास पोलीस कोठडीत राहावे लागले. यानंतर त्यांनी त्यांना झालेले दुखः आणि मानसिक आघात बोलून दाखवला. या प्रकरणानंतर त्यांना जामीन देखील काही अटी घालून देण्यात आला. ज्यानुसार त्यांना सुटका झाल्यानंतर खटला रद्द होईपर्यंत या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी, स्वतःच्या मुलांशी देखील संपर्क करता येणार नाही, अट घालण्यात आलीय
ब्राउन यांनी एलबीसीशी बोलताना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलींनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करावे यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याकरिता आयपॅड्स काढून घेतले होते. पण नंतर सरे (Surrey) पोलिसांनी ही उपकरणे त्यांच्या आईच्या कोभम येथील घरात ते आढळून आली. ही उपकरणे त्यांच्या मुलांची असल्याचे आढळून आले. यावेळी ब्राउन यांनी मुलांचे आयपॅड काढून घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार त्यांना असल्याचेही यावेळी नमूद केले.
ब्राउन यांनी तक्रार केली की, पोलिसांनी त्यांच्या एका मुलीला या प्रकारच्या चौकशीसाठी तिच्या वर्गातून बाहेर बोलवलं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्या संताप व्यक्त करताना म्हणाल्या की, “ते माझ्या मुलीच्या शाळेत पोलीस अधिकाऱ्यांना पाठवू शकले, ते दुसरी एक किंवा दोन पोलीस कार मला अटक करण्यासाठी पाठवू शकले….. मला माहिती आहे की आमच्या आजूबाजूच्या परिसरात लोक चोऱ्या, हल्ले आणि अत्यंत हिंसक गु्न्हे नोंदवत आहेत, आणि त्यांना कितीतरी दिवस कोणताही प्रतिसाद मिळत नाही.”
माजी पोलिस आणि गुन्हे आयुक्त अँथनी स्टॅन्सफेल्ड यांकडून झालेल्या टीकेला तोंड द्यावे लागत असले तरी सरे पोलीस माफी न मागण्याची भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट केले की पोलीस अधिकारी हे फक्त मुलाच्या काळजीपोटीच ब्राउन यांच्या मुलीच्या शाळेत गेले होते.