Funny video: असं म्हणतात की, लग्नानंतर जबाबदारी फक्त पुरुषावरच येत नाही, तर स्त्रीही त्यात बरोबरीची भागीदार असते. अशा परिस्थितीत मुली लग्नानंतर घरातील कामे सोपी करण्यासाठी मार्ग शोधत राहतात. हे मार्ग शोधण्यासाठी आणि घर सांभाळण्याचे टेन्शन दूर करण्यासाठी एका महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून घरच्या जबाबदाऱ्यांनी कंटाळलेल्या लोकांना थोडे हसण्याची संधी मिळेल. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला गूगलला विचित्र प्रश्न विचारताना दिसत आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महिलेचे विचित्र प्रश्न
व्हायरल व्हिडीओमध्ये ती महिला तिच्या फोनवर गूगलला विविध विचित्र प्रश्न विचारताना दिसत आहे. महिला सासरच्या मंडळींवर खूप नाराज आहे आणि आता फक्त गूगलच तिला त्यांच्यापासून आराम मिळवून देऊ शकेल, असे दिसते. अशा परिस्थितीत फूक मारून झाडू कसा काढायचा? हात न लावता भांडी कशी घासायची? असे भन्नाट प्रश्न महिला गूगलला विचारत आहे. त्याशिवाय ती महिला गूगलला विचारते की, तिने कोणते उपवास करावेत? जेणेकरून तिचा नवरा तिला न विचारता, बाहेरून जेवण आणेल. महिलेचे हे विचित्र प्रश्न ऐकून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
महिलेने गूगलला आणखी अनेक प्रश्न विचारले; ज्यात तिने गूगलकडून मंत्रही मागितला. महिलेने गूगलला विचारले, “कोणता मंत्र जपून, माझ्या सासूबाई माझ्याकडे येतील आणि मला दोन ते तीन महिने माझ्या माहेरच्या घरी जाऊन राहण्यास सांगतील. त्याशिवाय महिलेने गूगलला विचारले की, मी माझ्या सासू-सासऱ्यांना कसं नियंत्रणाखाली ठेवू शकेन, असं काय करावं लागेल; जेणेकरून माझी सासू आपोआप माझ्या नियंत्रणात येईल, असे विचित्र प्रश्न या महिलेने विचारले आहेत की, ते वाचून तुम्हीही पोट धरून हसाल एवढं नक्की.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हा चिमुकला कुणाच्या आधाराशिवाय प्रयत्न करतोय तर तुम्ही का नाही?” महिंद्रांनी शेअर केलला VIDEO विचार करायला भाग पाडेल
@saurmisra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे एक लाख २८ हजार वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “या बहिणीची समस्या गूगलही सोडवू शकणार नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले, “एवढा त्रास होता, तर लग्न का केले?” आणखी एका युजरने लिहिले, “प्रत्येक मुलीला ही समस्या असते.”