Woman attack on female police officer: शूर वीर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. पोलिस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता आपलं काम चोख बजावत असतात. त्यांची ड्युटी म्हणजे २४ तासच असते, असं म्हणायला काही हरकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांचं काम म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. चोरी, दरोडा आदी अनेक प्रकारचे गुन्हे रोखण्यासह राज्यात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीदेखील पोलिसांवर असते. महिलांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी अनेक महिला पोलीस अधिकारी तैनात असतात. पण, या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरच हल्ला झाला तर… सध्या अशीच एक भयंकर घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत एक महिला पोलिस महिला अधिकाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्यावर केला हल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भररस्त्यात एक महिला एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करताना दिसतेय. या मारहाणीचा प्रसंग पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची गर्दीदेखील जमली आहे; पण कोणीही त्या दोघींच्या मध्ये पडण्याचं धाडस केलं नाही. रस्त्यावर ही महिला एका महिला पोलिस अधिकाऱ्याचे कपडे खेचताना, तिचे केस खेचताना व तिला मारहाण करताना दिसतेय. अनेक जण ही घटना मोबाइल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करताना दिसतायत; पण कोणीही पुढे जाऊन त्यांचं भांडण सोडवण्यासाठी मदत करताना दिसत नाहीय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/sb_studio_plus/reel/DEqwMosCagP

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sb_studio_plus या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘इथे पोलिसच असुरक्षित आहेत’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १.९ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “भारतात काहीही होऊ शकतं.” दुसऱ्यानं, “अशा लोकांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “तिचे कपडे ओढले जात आहेत आणि लोक फक्त तमाशा पाहत आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman attack on female police officer on road rage video viral on social media dvr