एका महिलेने बस ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आपली स्वत:ची चूक असतानाही तिने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधली महिला बसचालकाच्या युनिफॉर्मची कॉलर पकडून मारहाण करताना दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी महिलेवर टिकेचा वर्षावर सुरू केलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा परिसरातला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला बसमध्ये घुसून चालकाला मारहाण करताना दिसत आहे. महिलेने ड्रायव्हरची कॉलर पकडली असून ती त्याला खूप शिवीगाळ करताना दिसत आहे. ही महिलेला ड्रायव्हरला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ड्रायव्हर इतर लोकांशी बोलण्याच्या बहाण्याने स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. ही सर्व मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ तिथल्या एका स्थानिक पत्रकाराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला.
आणखी वाचा : दारूच्या नशेत या व्यक्तीने सायकलसोबत भलतंच केलं कृत्य, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
त्यानंतर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही आपली प्रतिक्रिया देत हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. “महिलेने ड्रायव्हरला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे, हे निंदनीय आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.”, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.
आणखी वाचा : जेव्हा दोन हत्तींमध्ये ‘दंगल’ होते, त्यानंतर असा तांडव रंगला…पाहा Viral Video
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अशी मैत्री तुम्ही कधी पाहिली नसेल, या दोन मित्रांचा VIDEO VIRAL
रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडा परिसरातून ही महिला चुकीच्या बाजूने स्कूटीवरून जात होती. त्याचवेळी त्या बाजूने सरकारी बस जात होती. त्यावेळी तिची स्कूटी बसला धडकली. हे पाहून महिला राग अनावर झाला आणि बसमध्ये घुसून ड्रायव्हरला बेदम मारहाण करू लागली. स्वतःची चुक असून सुद्धा ड्रायव्हरची कॉलर पकडेपर्यंत तिची मजल गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व युजर्स या महिलेवर टिका करताना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे या महिलेवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील करू लागले आहेत.